Breaking newsMaharashtraPoliticsVidharbha

खामगाव रूग्ण कल्याण समितीवर भाजप शक्ती केंद्र प्रमुखाची नेमणूक : राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

बुलढाणा – (जिल्हा प्रतिनिधी)- राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधे दररोज शब्द वार सुरू आहे . भाजप नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय खा शरदचंद्र पवार यांच्यावर टीका करत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढावा यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली शरद युवा संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे सदर यात्रा बुलढाणा जिल्ह्यात 13 जून रोजी आगमन झाले आहेत तर ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यात जाऊन सर्वाशी संवाद साधून पक्ष वाढीसाठी काम करणार आहे. त्यातच नगर परिषदेचे पडघम वाजू लागले आहे तर आगामी नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खामगावात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. मात्र या घडामोडी दरम्यान पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्यातच खामगांव येथील सामान्य रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीवर एका भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्याच्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांमध्ये नाराजी पसरली असून ही एक खेळी आहे की राष्ट्रवादी सोबत छुप्या युतीचे संकेत आहे ? कारण राज्यात भाजप राष्ट्रवादी शब्दवार सुरू असताना खामगावात भाजप कार्यकर्त्याला दिलेली नियुक्ती याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे. या रुग्ण कल्याण समितीवर दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. ती नियुक्ती नुकतीच झाली असून राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नते माजी नगरसेवक नरेंद्र पूरोहित व भाजपा कार्यकर्ते सचिन पाठक यांची नियुक्ती झाली आहे. सचिन पाठक हे भाजपाचे कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जातात त्यांच्याकडे प्रभाग 9 चे भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख पद आहे व भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे सर्वश्रुत आहे. मग त्यांची नियुक्ती या पदावर कशी? तसे बघि तल्यास सचिन पाठक हे रा. काँ.चे खामगाव शहरातील एकमेव नगरसेवकांच्या कार्यालयात अनेक वेळा दिसून येतात. त्या ठिकाणी रा. काँ.चे जे वरिष्ठ पदाधिकारी येतात त्यांचे स्वागत करतांनाही दिसून येतात. याचा अर्थ त्यांनी भाजपाला रामराम तर ठोकलेला नाही ? पण तसेही दिसत नाही कारण नुकतीच एका वर्तमानपत्रामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी सचिन पाठक यांना शुभेच्छा देणारी भली मोठी जाहिरात देवून पालकमत्र्यांचे आभार मानले आहे. या नियुक्ती बाबत अनेक तक्रारी झाल्या आहेत . जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी, जिल्हा कार्याध्यक्ष टी. डी.अंभोरे , प्रदेश सरचिणीस प्रसेनजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रायपुरे यांच्यासह अनेक नेत्यांना लेखी व तोंडी तक्रारी देवून सुद्धा जिल्यातील नेत्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. या करून असे वाटते की राष्ट्रवादीला पक्ष वाढवायचा नसून भाजपला मोठे कार्याचे आहे असे चित्र दिसून येते. सचिन पाठक यांच्या नियुकीच्या तक्रारी झाल्याचे समजताच एका राष्ट्रवादीच्या नेत्याने सचिन पाठक यांचे जयंत पाटील आणि इतर राष्ट्रवादी नेत्यांसोबत काढलेले जुने फोटो सचिन पाठक यास जमा करून ठेवायचे सांगून सचिन पाठक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हास्तरीय नेते जो निर्णय घेत आहेत तो कदाचित पक्षाला घातक ठरू शकतो किंवा ही आगामी निवडणूकीच्या दृष्टीने खेळलेली एक चालही असू शकते मात्र यामुळे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते मात्र नाराज होत आहेत. या समितीवर दुसरा सदस्यही राष्ट्रवादीचाच असायला हवा अशी मानसिकता कार्यकर्त्यांची ची आहे. त्याच प्रमाणे बरेच वेळा भाजपा आणि रा. कॉ. यांची खामगांवात न.प. निवडणूकी करीता युती होणार असल्याच्या अफवाही पसरत आहे त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडतात. त्याचाही खुलासा जेष्ठ नेत्यांनी करणे गरजेचे असून पक्षात उपरयांना कोणतेही स्थान न देता मा. शरदचंद्र पवार, ना. अजितदादादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्रजी शिंगणे, प्रसेनजित , जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी कार्याध्यक्ष टी .डी. अंभोरे यांना मानणारा व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना कोणत्याही समितीवर नियुक्ती करताना स्थान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!