प्रशासनावर दबाव आणण्यासाठी क्षीरसागर कुटुंबाने सुरु केले उपाेषण!
कर्जत (प्रतिनिधी) : शहरातील कुंभार गल्लीत जाणारा रस्ता होण्यास एका कुटुंबामुळे अडचण येत असून अनेकांचे घरांसमोरील ओटे काढले असताना सार्वजनिक मंदिराच्या जागेत असलेला जिना काढला म्हणून हे कुटुंब उपोषण करत प्रशासनावर दबाव टाकण्याचा व सर्वाना वेठीस धरत आहे. या कुटुंबाने गल्लीत घराघरासमोर जाऊन कुंभार समाजातील लोकांना दमदाटी केली आहे, मारहाण केली आहे अशा कुटुंबाविरुद्ध प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन पोलीस स्टेशनला कुंभार गल्लीतील कुटुंबीयांनी एकत्र येत दिले आहे. याच बरोबर प्रत्यक्ष गल्लीतील सर्व परिस्थिती पत्रकारांंना दाखवत न्याय देण्याची मागणी केली.
कर्जत येथील कुंभार गल्लीत जाण्यासाठी अत्यंत अरुंद बोळ असून यामुळे गणपती बनवणारे, माठ बनवणारे, रांजन बनवणारे, यांंना आपले साहित्य डोक्यावर घेउन रस्त्याला आणावे लागते. त्यामुळे गल्लीतील सर्व व्यावसाईकांनी एकत्रित नगर पंचायत कडे मागणी करत गेली अनेक वर्षे न झालेला रस्ता बनवण्याची मागणी केली. त्यानुसार नगर पंचायतने रस्ता करण्यासाठी मंदिराच्या जागेत असलेला जीना जो अरुंद रस्त्यावर येत होता तो काढला
व रस्ता करण्यासाठी इतर अनेकांचे ओटे ही काढले. मात्र यावरून मंदिराच्या पाठीमागील क्षीरसागर कुटुंबीयांनी नगर पंचायत समोर आमरण उपोषण सुरू करत प्रशासनालाच वेठीस धरत रस्ता करण्याला आडकाठी आणली आहे.
प्रत्यक्षात या कुटुंबाला कुणाचाही पाठिंबा नाही, आम्ही सर्व एक असताना हे आमच्या वर खोट्या सह्या केल्याचे आरोप करत आहेत. मात्र संपूर्ण कुंभार समाज एका बाजूला असून हे कुटुंबीय कुंभार काम करत नाहीत त्यामुळे त्यांंना आमच्या हालअपेष्टा दिसत नाहीत व हे सर्व समाजालाच वेठीस धरत असून या परिवारातील आशा क्षीरसागर यांनी नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांंना घाण घाण शिव्या तर दिल्याचं तर अजिंक्य क्षीरसागर याने हातात विटा घेऊन गल्लीतील घरा समोर जाऊन दमदाटी केली. ऋतुजा अजिंक्य क्षीरसागर हिने गल्लीतील महिला ना लाथा बुक्क्यानी मारहाण केली. विश्वनाथ क्षीरसागर याने गांजा पिऊन येत मी एक एकाचा काटाच काढतो अशी धमकी दिली आहे, तर अमोल क्षीरसागर याने कुंभारडे भिकमांगे खूप माजले आहेत, यांचा बाहेरचे लोक आणून काटा काढावा लागेल, असे म्हटल्याचे कर्जत पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रार अर्जात नमूद आहे. या कुटुंबियांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कुंभार गल्लीतील सर्वानी पत्रकारांंना गल्लीत बोलावून आम्ही हातावर पोट असलेले लोक आहोत, आमच्या गणपतीचा सिझन महिन्यावर आला आहे, गल्लीत छोटी मोठी गाडी येऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला घरापासुन भट्टीपासून आमचा बनवलेला माल डोक्यावर आणावा लागत असून आमच्या सर्वाच्या सोई साठी रस्ता करण्यात यावा, अशी मागणी कुंभार गल्लीतील नागरिकांनी केली आहे, अशी माहिती दिली. यावेळी पांडुरंग क्षीरसागर, अंकुश क्षीरसागर, साहेबराव क्षीरसागर, शिवाजी क्षीरसागर, रामदास क्षीरसागर, नाना क्षीरसागर, फिरोज सय्यद, सोनाली क्षीरसागर, सत्यशीला क्षीरसागर, आकाश क्षीरसागर, आदींसह अनेक जण उपस्थित होते.