SINDKHEDRAJA

वरूडी येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी सौ. रंजना गारोळे बिनविरोध

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – महिला या पुरूषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताना दिसत आहे. मग ते राजकारण असो, किंवा समाजकारण असो, किंवा नोकरीमध्ये असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला काम करताना दिसत आहे. अनेक गावांमध्ये अनेक महिला सरपंच पदावर विराजमान आहेत, पोलीस पाटीलसुद्धा महिला काम करताना दिसत आहे, ग्रामसेवकसुद्धा महिलाच आहे. ग्रामीण भागात पोस्टमन या पदावर महिलाच कार्यरत आहेत, काही अपवाद वगळता महिलाच काम करताना दिसत आहे. असेच कार्य सिंदखेडराजा तालुक्यातील प. पू. तेजस्वी महाराज यांच्या पावनभूमीने नावलौकिक असलेल्या वरूडी येथे पहावयास मिळाले. सर्वानुमते गावाच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सौ. रंजना गारोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दि. २६ ऑगस्टरोजी वरोडी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंचा सौ.अन्नपूर्णा सुधाकर गारोळे ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून सचिव सरला गावडे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पुंजाजी गारोळे, माजी उपसरपंच सुमेध गवई, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप खरात, कृषी सहाय्यक पाचरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला तंटामुक्ती अध्यक्ष पदाकरता अनेकांनी अर्ज दाखल केले होते. परंतु पहिल्यांदा तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी महिलेला संधी दिली पाहिजे, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होऊन अनेकांनी अर्ज मागे घेतले व बुलढाणा जिल्ह्यातून पहिल्यांदा वरुडी गावांमधून सौ.रंजना भास्कर गारोळे यांची बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांची निवड होताच पोलीस पाटील सुनील गारोळे, भास्कर महाराज गारोळे, गौतम वानखेडे, आदिनाथ गारोळे, भागवत गुंजकर, मनोहर गारोळे, दिलीप गवई, ठेकेदार मिलिंद मोरे यांनी नवनिर्वाचित महिला तंटामुक्ती अध्यक्ष यांचे स्वागत केले. पहिल्यांदा तंटामुक्तीच्या अध्यक्षपदाकरता महिलेची निवड करण्यात आली असून, इतर गावांनी वरुडी गावाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे, सदर ग्रामसभेला बीट जमदार संदीप सुरडकर यांनी खडक बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!