SINDKHEDRAJAVidharbha

ई-पीक पाहणी नोंदणीसाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, उर्वरित शेतकर्‍यांना दिलासा!

- मुदतवाढीचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा; उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांचे आवाहन

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी ई-पीक पाहणी अर्थात अँपद्वारे पिकाची नोंदणी करण्यासाठी आणखी सात दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत राहिलेल्या शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे. अन्यथा, यापुढे विविध अनुदान, शासकीय लाभापासून वंचित रहावे लागू शकते, असा धोक्याचा इशाराही प्रा. खडसे यांनी दिलेला आहे.

दिनांक १ ऑगस्ट २०२४ पासून ते १५ सप्टेंबरपर्यंत खरीप हंगाम २०२४ करिता शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी करण्यासाठी वेळ दिला होता. पण मागील काही दिवसापासून सर्व्हर डाऊन असणे, अपलोड न होणे, अंतिम अहवाल न येणे, अशा अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना ई-पीक पाहणी करता आली नाही. यामुळे आता ही पीक पाहणी करण्यासाठी आणखी सात दिवसाची मुदतवाढ म्हणजेच २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे राहिलेल्या शेतकर्‍यांना ई-पीक पाहणी करता येणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये जे पीक पेरले आहे त्या पिकाची नोंदणी ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे करावे. ई-पीक पाहणी न केल्यास यानंतर आपणास नैसर्गीक आपत्ती अनुदान, पीक विमा तसेच त्यासंबंधी शासनाचे लाभ ई-पीक पाहणीच्या आधारे मिळणार आहेत, याची नोंद घ्यावे. शासनाने वेळोवेळी जाहीर केलेली मदत ही ‘ई पीक पाहणी’च्या आधारे दिल्या जात आहे. यापुढील अनुदानसुद्धा हे ‘ई पीक पाहणी’च्या आधारावर दिल्या जाणार आहे. याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. त्यामुळे सिंदखेडराजा उपविभागामधील ज्या शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी केली नाही, त्यांनी करून घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!