ChikhaliHead linesVidharbha

विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा!

चिखली (महेंद्र हिवाळे) – महाराष्ट्रामध्ये बदलापूर, अकोला, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाले आहेत. या अनुषंगाने चिखली शहरातील नगरपालिका शाळा, कॉन्व्हेंट, प्रायव्हेट संस्था व इतर शाळा तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालये तसेच शालेय ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच तहसीलदार चिखली यांच्यामार्फत राज्य सरकारला देण्यात आले आहे.

हे निवेदन देतेप्रसंगी डॉ.सौ.ज्योतीताई खेडेकर, पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, अमोल खेडेकर, विठ्ठल मापारी, गणेश देशमुख चिखली शहर अध्यक्ष, सोहम साळवे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, गणेश पवार सोशल मीडिया तालुकाध्यक्ष, अजय कर्‍हाडे, जय गायकवाड, शिवाजी भोसले, आदित्य गवते, आनंद निकम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या निवेदनातून राज्यात विद्यार्थिनींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली असून, सरकारने तातडीने उपाययोजना करून विद्यार्थिनींना सुरक्षा देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!