SINDKHEDRAJAVidharbha

केमिकलयुक्त गुलालावरून गणेशोत्सव मंडळे-प्रशासन आमने-सामने!

- साखरखेर्डा येथे किराणा दुकानातून पोलिसांनी केला केमिकलयुक्त गुलाल जप्त - गुलाल नाही तर विसर्जन नाही, गणेश मंडळांनी घेतला पवित्रा

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत केमिकलयुक्त गुलाल घेण्यास शासनाने बंदी घातली असताना, काल एका किराणा दुकानातून गुलाल जप्त करण्यात आला. त्या अनुषंगाने सर्व मंडळांनी दि. १४ सप्टेंबररोजी बैठक घेऊन गुलाल नाही तर गणपती विसर्जन होणार नाही, असा पवित्रा मंडळांनी घेतला. गुलालावरून गणेशोत्सव मंडळे व प्रशासनात वितुष्ट आल्याचे यानिमित्ताने दिसून आले असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

साखरखेर्डा येथील आशीष बेंदाडे यांच्या किराणा दुकानातून केमिकलयुक्त गुलाल ठाणेदार गजानन करेवाड यांनी जप्त केला. बुलढाणा जिल्ह्यात ही घटना प्रथमच घडली असून, यामुळे गणेश भक्ताता तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गणेश मंडळांना केमिकलयुक्त गुलालऐवजी हर्बल गुलालाचा वापर करण्यात यावा. असा आदेश पोलिसांनी जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पालन करीत सूचना दिल्या आहेत. परंतु, बाजारात हर्बल गुलाल उपलब्ध नसल्याने गणेश भक्तांनच्या उत्साहाला अर्थ राहिला नाही. अशी प्रतिक्रिया सर्वच मड़ळाच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. गुलाल नाही तर विसर्जन होणार नाही असा पवित्रा काहींनी घेतला. यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी गोपाल पाझडे, गोपाल शिराळे, सिताराम काळे, दिलीप बेंडमाळी यासह सर्व मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
—–
गणेशोत्सव मिरवणूकीत गुलाल उधळणे ही आमची संस्कृती आहे. निवडणुकीत गुलाल उधळण्याला बंदी नसते. त्यात सर्वच समाजांचे नेते गुलाल अंगावर घेतात. केवळ गणपती विसर्जन मिरवणूकीत गुलाल उधळणे गुन्हा आहे का? असा प्रश्न उपस्थित करुन गुलाल नाही तर विसर्जन होणार नाही, असा पवित्रा आम्ही घेतला आहे.
– संतोष मंडळकर, अध्यक्ष तंटामुक्ती समिती, साखरखेर्डा
—-
डीजे बंदी, वाद्य बंदी, गुलाल बंदी हे कायदे केवळ हिंदू समाजावर लादले जात असतील तर हा निर्णय चुकीचा आहे. गुलाल उधळीत विसर्जन मिरवणूक काढली जाणार.
– गोपाल राजपूत, शिवसेना कार्यकर्ते
—-
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन सर्वांनी करावे. आणि, गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी असा आमचा प्रयत्न आहे. सर्वांनी सहकार्य करावे.
– गजानन करेवाड, ठाणेदार, साखरखेर्डा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!