पाचोड (विजय चिडे) : शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणार्या अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याकरिता पोलीस विभागाकडून ‘पोलीस काका, पोलीस दीदी’ हा उपक्रम पाचोड पोलिसांनी सुरु केला आहे. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना काही त्रास झाल्यात पाचोड पोलिसांकडे विद्यार्थ्यांनी आपल्या तक्रारी करता येणार आहे. या उपक्रमाचे पालकांकडून तसेच शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून स्वागत होत आहे. पाचोड पोलिस ठाण्यांचे पोलिस नाईक पवन चव्हाण यांची पोलिस ‘काका’ म्हणून निवड केली आहे तर पोलिस नाईक वर्षा कबाडे, पोलिस नाईक चंदा राठोड यांची पोलिस ‘दिदी’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
या पोलिस काका व पोलिस दिदी यांच्या पथकद्वारेपाचोड परिसरातील सर्व शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना माहिती दिली आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर टाळावे, तसेच ब्ल्युव्हेल, लुडो, तीनपत्ती पबजी खेळांपासून दूर राहावे, तसेच घरबसल्या ऑनलाईन तक्रार कशी करावी, यासह पोलीस प्रशासनातील कामकाजासंदर्भात माहिती दिली आहे. तर यावेळी पोलिस दिदी पो.ना.वर्षा कबाडे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस काका व दीदीचा मोबाईल क्रमांक दिला आहे. तसेच पोलीस काका, दीदी यांनी परस्पर संवादी जागरूकता कार्यक्रमात वाहतूक आणि रस्ते सुरक्षा, सायबर गुन्हे, माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ अल्पवयींनावर होणारे लेंगिक गुन्हे, रॅगिंग, ड्रग्ज, इतर विषयावर त्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यांच्या नियमित संपर्कात राहावे, शाळा भेट रजिस्टर ठेवावे व त्याच्या नोंदी रजिस्टरमध्ये घ्याव्या, असे ही सांगितले आहे.
त्याचबरोबर शाळेच्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व इतर महत्त्वाच्या कामात सहभागी व्हावे, पोलिसांचे कामे व कर्तव्याबाबत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सूचित करावे, विविध वयोगटातील विद्यार्थांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याविषयी जागरूकता निर्माण करावी, तरी पोलीस काका व दीदीवर यांच्यावरील देखरेख पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांची असणार आहे. यावेळी पोलिस काका पो.ना.पवन चव्हाण यांनी बोलताना म्हटले की, कुठल्याहीक्षणी दूरध्वनीवरून संपर्क केल्यास पोलीस ताबडतोब मदतीला धावून येतील. त्यामुळे निर्भयपणे परिसरात घडणार्या गुन्ह्याच्या घटनांची माहिती पोलिसांना देव्यात, असे आवाहन पथकातील कर्मचार्यांकडून विद्यार्थ्यांना केले आहे.
Leave a Reply