पाचोड (ब्रेकिंग महाराष्ट्र) – पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथे गावातील समाज मंदिराच्या बाजूला पैशावर साेरट नावाचा जुगार खेळणार्यांवर पाेलिसांनी छापा टाकला. हा जुगार खेळविणारे बब्बू सत्तार शेख रा.हिरडपुरी ता.पैठण यांच्यावर पाचोड पोलिसांनी (दि.१९) रोजी मंगळवारी ही कारवाई केली.
विहमांडवा पासुन नजदिक असणाऱ्या हिरडपुरी येथील गावात असणाऱ्या समाज मंदिरासमोर सोरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती गुप्तबातमीदारामार्फत पाचोड पोलिस ठाण्यांचे सहा.फौजदर सुधाकर मोहीती यांना भेटली असता, ते रात्री आठवाजेच्या सुमारास खाजगी वाहनाने हिरडपुरी येथे जाऊन माहीती भेटलेल्या ठिकाणी अचानकपणे आठ वाजेच्या सुमारास छापा मारला. तिथे सोरट नावाचा जुगार खेळत असलेले काही व्यक्ती दिसले मात्र अंधाराचा फायदा घेऊन ते तेथूध पळून गेले. सोरट नावाचा जुगार खेळविणार व्यक्तीचे नाव बब्बू सत्तार शेख रा.हिरडपुरी ता.पैठण जि.औरंगाबाद असे आहे. यामध्ये घटनास्थळावरून काही चलनी नोटा सह २,५०० रोख रक्कम सह एक आकाशी रंगाचा चार्ट ज्यावर पप्पु प्लेइंग पिक्चर असे इंग्रजीत हिलेले व त्यावर बारा चित्रे छत्री, बॉल, सूर्य, दिवा, गाय, बकेट पंतग असे प्रकारचे एकूण १२ चित्रे व त्यावर गुलाबी व निल्या रंगाचे चिया चिट १२ ओळी त्यापैकी काही काही चिया फाटलेले व काही शाबीत चिया असलेले चार्ट कि.अ. हे वर्णणाच्या किंमतीच्या मुद्देमाल घटनास्थळी जप्त केला आहे. या घटनेचे बाबतीत पाचोड पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार सुधाकर मोहीते हे करीत आहेत.