नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार तसेच महिला व बाल विकास विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आज कृषि विज्ञान केंद्र, कोळदा येथे धडगाव व शहादा तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे पोषण आहार संदर्भात प्रशिक्षण संपन्न झाले.
या प्रशिक्षण शिबिरास उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास ) के.एफ राठोड, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. या प्रशिक्षणात पोषण आहारातील जीवनसत्वांची कमतरता भरुन काढण्यासाठीचे उपाय, समतोल आहार पद्धती , फोर्टीफाईड तांदुळ, जंक फुड खाण्याचे दुष्परिणाम, आहारातील तेल, मीठाचे प्रमाणाबाबत अंगणवाडी पर्यवेक्षिकांना चित्रफितीद्वारे श्री. कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या शंकाचे निराकरणही करण्यात आले.