Breaking newsBuldanaBULDHANACrimeHead linesKhandeshVidharbha

भरधाव खासगी बसची दुचाकीला धडक, तिघे ठार

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजीनजीक भरधाव असलेल्या खासगी बसने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आज (दि.१५) मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वराड येथील गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्षे जळगाव) शहरातील गिरणा कॉलनी येथील स्वप्निल भैया करणकार (वय २४ वर्षे) यांचा घटनासथळावर मृत्यू झाला. कल्याण येथील रहिवासी आकाश राजू आखाडे (वय ३० वर्षे) यांचा मलकापूर येथे रूग्णालयात घेवून जाताना मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून, याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. या महामार्गाचे कामही धोकादायकरित्या सुरू आहे.

राष्ट्रीय महामार्गावर वडनेर गावाजवळ एआर ०१.ज.७७४१ क्रमांकाच्या खासगी बसने एमएच २८ बीएस ७८२१ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतक जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशन व नांदुरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच, विलास निबोळकर, कृष्णा नालट, अश्विन फेरण, राजु बगाडे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी रक्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांना ओम साई फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेने तातडीने नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.


राष्ट्रीय महामार्गावर वडनेर गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर वडनेरजवळ Hr ०१ J ७७४१ क्रमांकाच्या खासगी बसने MH ०५ bs ७८२१ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वराड येथील गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्षे जळगाव) शहरातील गिरणा कॉलनी येथील स्वप्निल भैया करणकार (वय २४ वर्षे) यांचा घटनासथळावर मृत्यू झाला. कल्याण येथील रहिवासी आकाश राजू आखाडे (वय ३० वर्षे) यांचा मलकापूर येथे रूग्णालयात घेवून जाताना मृत्यू झाला. अपघातात प्राण गमावलेल्या दोघांचे प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे तर तर तिसऱ्याचे मलकापूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत नांदुरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश जायले, ओम साई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर, कृष्णा नालट, आश्विन फेरण, राजू बगाडे रुग्णवाहिकासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातातील मृतांना प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे आणले. घटनास्थळी ओमसाई फाउंडेशनचे विलास निबोळकर, कृष्णा नालट, अश्विन फेरण, राजु बगाडे, नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी संजय निबोळकर, विक्रम राजपूत, अनिल खंडारे, गोरानी वेरुळकार यांनी मदत केली. स्वप्नीलचे दीड वर्षांपूर्वीच झाले लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षातच स्वप्नीलचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!