राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. विकास मिसाळ यांनी ठिय्या आंदोलन करताच शेतीपंपांचा वीज पुरवठा सुरूळीत!
– आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मध्यस्थीनंतर डॉ. मिसाळ यांचे आंदोलन मागे!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीपंपांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. पिके धोक्यात आली असून, ग्रामीण भागात भीषण समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे ग्रामस्थ व शेतकरी हवालदिल झालेले आहेत. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. विकास मिसाळ यांनी आज (दि.१४) शेळगाव आटोळ येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात अमोना, मिसाळवाडी, पिंपळवाडी येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेळगाव आटोळ येथील शेतकरी व ग्रामस्थांसह ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे महावितरणचे चांगलेच धाबे दणाणले. या आंदोलनाची माहिती माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कळताच त्यांनी डॉ. विकास मिसाळ यांच्याशी संपर्क साधून, महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना तातडीने वीज पुरवठा सुरूळीत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून शेतीपंपांचा वीज पुरवठा सुरूळीत सुरू झाला. आ. डॉ. शिंगणे यांच्या या यशस्वी मध्यस्थीनंतर डॉ. विकास मिसाळ यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
डॉ. विकास मिसाळ यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या या ठिय्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी यांच्यासह मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील मिसाळ, उपसरपंच हनुमान मिसाळ, अमोनाचे सरपंच प्रल्हाद इंगळे, उपसरपंच लहू वानखेडे, सदस्य डॉ. शिवदास भांदर्गे, शेळगाव आटोळ ग्रामपंचायतीचे सदस्य कैलास बोर्ड, शरद गावडे, दत्तू तावरे, अंबादास मोरे, मधुकर हरिभाऊ वाघ, भगवान गावडे, दिनकर मघाडे, ताईतराव माने, भानुदास गोळे, भगवान आटोळे, मनोहर मिसाळ, कृष्णा मिसाळ, भास्कर मिसाळ, अंबादास भगत, पवन मिसाळ, श्रीराम मिसाळ, प्रल्हाद कोलते, विकास मिसाळ, सतिश भगत, भागवत भगत, प्रकाश मिसाळ, रामदास मिसाळ, गजानन मिसाळ, समाधान गालाट, कैलास गालट, प्रकाश गालट, दिलीप लोखंडे, अनिल गालट, अक्षय गालट, राजू गालट, विकास गालट, प्रल्हाद मिसाळ, तुळशीराम भगत, राहुल काकडे, योगेश भगत, सुरज मिसाळ आणि परिसरातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झालेले आहेत.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. विकास मिसाळ यांनी चर्चा केल्यानंतर आमदार डॉ. शिंगणे यांनी संबंधित विभागाचे उपअभियंता श्री शेटे यांच्याशी चर्चा करून त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्याच्या सूचना दिल्या, तदनंतर संबंधित विभागाकडून तांत्रिक अडचणी दूर करून विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आल्याने शेतकर्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
————–