BULDHANAChikhaliHead linesKhamgaonVidharbha

तुपकरांच्या एल्गार मोर्चाला सरकार घाबरले; जिल्ह्यातील ७२ मंडळांत दुष्काळ जाहीर!

– राज्यातील आणखी १०२१ महसूल मंडळातही दुष्काळाची घोषणा

बुलढाणा (बाळू वानखेडे) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करावा, बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुके वगळता भीषण दुष्काळ असताना सरकारने ठरावीक तालुक्यातच दुष्काळ कसा काय जाहीर केला, यासह कापूस व सोयाबीन पिकाच्या नुकसान भरपाईसाठी एल्गार मोर्चाची हाक दिली असताना आणि त्यासाठी जिल्हाभर रथयात्रा सुरू असताना, तुपकरांच्या या आंदोलनामुळे घाबरलेल्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने अखेर बुलढाणा जिल्ह्यातील आणखी ७२ महसूल मंडळात तसेच राज्यातील १०२१ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, देऊळगावराजा या तालुक्यांतील मंडळांचाही समावेश आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सत्ताधारी गटाच्या आमदारांच्याच तालुक्यांत व फक्त ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील फक्त दोन तालुके घेतले होते. याबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्ह्यात एल्गार रथयात्रा काढत महामोर्चाचा इशारा दिला होता. तुपकरांच्या या भूमिकेनंतर सरकार खड़बड़ून जागे होत राज्यातील आणखी १०२१ महसूल मंड़ळात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ७२ महसूल मंड़ळाचाही समावेश आहे. यामध्ये कृषी वीजबिलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण यासह विविध सवलती मिळणार असून, कोणतीही ठोस व रोख मदत मात्र मिळणार नसल्याचे शासन निर्णयावरून दिसत आहे.
राज्यात बरेच भागात पाऊस पड़लाच नाही तर कुठे भरपूर बरसला. यामुळे पीक झालेच नाही. असे असताना शासनाकड़ून राज्यातील फक्त ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील लोणार व बुलढाणा ही दोनच सत्ताधारी आमदारांची तालुके घेण्यात आली. त्यामुळे शेतकरीवर्गात तीव्र नाराजी पसरली होती. पाऊस नसल्याने जिल्ह्यातील मुख्य पीक सोयाबीन व कपाशी पूर्णतः गेली होती. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातही दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी दहा हजारांची आर्थिक मदत द्यावी व इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एल्गार पुकारला असून, २० नोव्हेंबररोजी बुलढाणा येथे महामोर्चा आयोजित केला आहे. याचा धसका घेत शासनाने राज्यातील ज्या महसुली मंड़ळात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकुण पर्जन्यमान ७५० मीमी पेक्षा कमी झाला, अशा १०२१ महसूल मंड़ळामध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित केली आहे. यासह विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगड़ीत कर्जवसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सवलत, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी परीक्षा शुल्क माफ, रोहयो कामातील निकषात शिथिलता, टंचाई जाहीर गावात शेतीचा वीजपुरवठा खंड़ीत न करणे यासह इतर सवलती मिळणार असल्या तरी ठोस व रोख मदत मात्र मिळणार नसल्याचे शासन निर्णयातून दिसून येते.
यामध्ये जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील चिखली, हातणी, अमड़ापूर, उदयनगर (उंद्री), एकलारा, कोलारा, मेरा खु. धोड़प, पेठ, शेलगाव आटोळ, चांधई या गावांचा तर देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव राजा, देऊळगाव मही, अंढेरा, तुळजापूर, मेव्हणाराजा या गावांचा, मेहकर तालुक्यातील मेहकर, जानेफळ, ड़ोणगाव, देऊळगाव माळी, हिवरा आश्रम, लोणी गवळी, अंजनी, वरवंड़, नायगाव दत्तापूर या गावांचा, सिंदखेडराजा तालुक्यातील सिंदखेड़राजा, मलाकापूर पांग्रा, सोनोशी, किनगावराजा, दुसरबीड़, शेंदुर्जन,साखरखेर्ड़ा, मलकापूर तालुक्यातील दाताळा, धरणगाव जांबुळधाबा, मोताळा तालुक्यातील मोताळा, बोराखेड़ी, धामणगाव बढे, पिंप्री गवळी, रोहीनखेड़, शेलापूर बु, पिंपळगाव देवी, नांदुरा तालुक्यातील नांदुरा, वड़नेर, शेंबा, निमगाव, चांदुर बिस्वा, महाळूंगी, खामगाव तालुक्यातील खामगाव, पिंपळगावराजा, हिवरखेड़, काळेगाव, लाखनवाड़ा, अटाळी, आवार, पळशीबु. अड़गाव, वझर, पारखेड़, शेगाव तालुक्यातील माटरगाव, जलंब, जवळाबु., मनसगाव, जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव, जामोद, पि.काळे, वड़शिंगी, आसलगाव, संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर, बावनबीर, पातुर्ड़ा, कवठळ, सोनाळा आदी महसूल मंड़ळाचा समावेश आहे. याबाबतचा शासन निर्णय काल, १० नोव्हेंबररोजी जारी करण्यात आला आहे.

https://breakingmaharashtra.in/buldhana_drought-3/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!