Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

भाजपच्या सर्वेक्षणात ‘प्रतापराव’ खासदारकीला पडणार?

बुलढाणा (बाळू वानखेडे) – भारतीय जनता पक्षाने केलेल्या जनमत सर्वेक्षणात बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना अनुकूल वातावरण नसून, त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास ही जागा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या जागेसाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. तर भाजप बुलढाण्याची जागा हिसकावण्याची शक्यता पाहाता, शिंदे गटाने आ. संजय गायकवाड यांना पुढे केले असून, ही जागा शिवसेनेची असून, आम्ही ही जागा सोडणार नाही. प्रतापराव पडणार असतील तर मी ही जागा लढवेल व निवडून येईल, असे आव्हान आ. गायकवाड यांनी दिले आहे. त्यामुळे बुलढाण्याच्या जागेवरून भाजप-शिंदे गटात नजीकच्या काळात राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुलढाण्यात अमरावती पॅटर्न राबवून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना लोकसभेत पाठविण्यासाठी अंतस्थ पातळीवर राजकीय घडामोडी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.

Sanjay Gaikwad,प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरुन शिंदे समर्थक आमदार  खासदारांमध्ये मतभिन्नता, म्हणाले... - sanjay gaikwad angry over prasad lad  statement but prataprao jadhav said no ...भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकांचे सर्वेक्षण केले असून, या सर्वेक्षण निकालात, बुलढाण्यात जी लोकसभेची जागा आहे, ती चार नंबरवर दाखण्यात आली असून, खासदार प्रतापराव जाधव हे निवडून येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. भाजप हा बुलढाण्याच्या जागेवर डोळा ठेवून असल्याने याबाबत शिंदे गटाच्यावतीने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना पुढे करण्यात आले असून, त्यांनी ‘जर ही जागा भाजपने घेतली तर मी या लोकसभेची निवडणूक लढवेन आणि जिंकेनही’, असा दम भाजपला भरला आहे.

13 व्या लोकसभेचा सर्वे भाजपाने केला आहे. त्यात बुलढाण्याची जागा चार नंबरला दाखविली आहे. शिवसेनेचा उमेदवार निवडून येत नसल्याने ही जागा शिंदे गटाकडून भाजपाला देण्यात यावी अशी मागणी भाजपाकडून होत आहे. परंतू शिवसेना एकनाथ शिंदे गट आपली जागा सोडायला तयार नसल्याने या जागेसाठी सेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा लागला आहे. 

बुलढाण्यातील लोकसभेची जागा ही सद्या शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख असून, या मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या आहेत. सद्या शिंदे गट व भाजपची युती असून, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटदेखील सहभागी आहे. या तिघांमध्ये लोकसभेच्या जागेवरुन बरेच संभ्रम आणि वाद आहेत. त्यात आता आ. संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे भर पडली आहे. आ. संजय गायकवाड म्हणाले, की बुलढाण्यातील लोकसभेच्या जागेची मागणी सद्या भाजपकडून होत आहे. भाजपच्याच सर्वेक्षणामध्ये ही जागा चार नंबवर दाखवल्याने ही जागा आम्हाला द्या, असे भाजपचे म्हणण आहे. ही जागा शिंदे गटाकडे असल्यामुळे ती जागा निवडून येणार नाही, त्यामुळे ती जागा आम्ही लढवतो. पण शिवसेनेची लोकसभेची जागा देणार नाही, तिथे खासदार प्रतापराव जाधवच निवडून येतील. पण जर प्रतापराव जाधव जर निवडून येत नसतील तर आम्ही ही जागा लढायला तयार आहोत. माझा सर्वे करा, मग तुम्हाला समेजल की नक्की काय आहे ते. मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काही इच्छुक नाही, पण प्रतापराव जाधवांना उमेदवारी दिली नाही तर शिवसेनेचा जागा राखण्यासाठी मी तो निर्णय घेऊ शकतो’, असे आ. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!