-२६५ ग्रामस्थांची नेत्रतपासणी; ११४ जणांना मोफत चष्मे, २५ मोतीबिंदू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया
चिखली (राजेंद्र घुबे ): महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार तसेच माजी मंत्री स्व. भारतभाऊ बोंद्रे यांच्या जयंतीनिमित्त चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित जयंती उत्सव पंधरवड्याअंतर्गत मंगरूळ (ई) येथे मोफत नेत्र तपासणी व औषध वाटप शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिरात एकूण २६५ ग्रामस्थांची नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीनंतर ११४ रुग्णांना चष्म्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. संबंधित रुग्णांचे नंबर नोंदवून त्यांना येत्या काही दिवसांत मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच सुमारे २५ रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले असून, त्यांची शुगर व रक्तदाबाची तपासणी करून मोफत शस्त्रक्रिया करून देण्याची जबाबदारी आयोजकांनी स्वीकारली. शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शंतनुजी बोंद्रे होते. प्रमुख उपस्थितीत चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष परिहार, कार्याध्यक्ष लक्ष्मण कव्हळे, वसीम शेख, गणेश राजे, शेनफड पाटील, दामूअण्णा शिंदे आणि अक्षय सुरुशे उपस्थित होते. शिबिरासाठी नेत्र शल्यचिकित्सक डॉ. भिलावेकर, डॉ. गवते, डॉ. खेडेकर, नेत्रचिकित्सा अधिकारी श्रीमती हिवराळे, श्री. सवडतकर, श्री. गाडेकर, श्री. पोळ, आरोग्य सेविका भोपळे तसेच आरोग्य सेवक नवरे यांनी रुग्णांना सेवा दिली.