नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या मतदारसंघातील अक्कलकुवा ते धडगाव या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटर नसल्याने पावसाळ्यातील वाहून येणारी माती हे रस्त्यावर येऊन जमा झाली आहे आणि रस्त्यात मोठमोठे खड्डेही पडले आहेत. धडगाव तालुक्यातील मुंदलवाड तलाई यासारखे पाड्यांवरती राहणारे लोकांना बाजार रुग्णालय शाळा यासारख्या पायाभूत गरजेसाठी ह्या रस्त्याच्या वापर करावा लागत आहे. रस्त्याची दुरवस्था मुळे अनेक अपघातही होत आहे आपत्कालीन स्थितीत ॲम्बुलन्सलाही जाण्यासाठी या रस्त्याच्या उपयोग करावा लागतो.