चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – चिखली एमआयडीसीजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोनपैकी एका जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. हे युवक खैरव येथील असल्याचे सांगण्यात येते. चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रकचालकाचा शाेध घेतला जात आहे. तर एका गंभीर व अत्यवस्थ जखमीला सीरिअस असल्याने औरंगाबाद येथे हलविण्यात आले असून, त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची तब्येत सीरिअस असल्याचे सांगण्यात आले.
भरधाव ट्रकने दिलेली धडक इतकी जबरदस्त होती, की दुचाकीवरील हे युवक रस्त्यावर कोसळून जागीच ठार झाले. ट्रक चालक आपले वाहन घेऊन पळून गेला. घटनास्थळी चिखली पोलिसांनी धाव घेऊन दोघाही युवकांना तातडीने रुग्णालयात हलवले. परंतु, त्यापैकी एक जण मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. अधिक तपास पोलिस करत आहेत. घटनास्थळाचे चित्र इतके विदरण होते, की पाहणार्याच्या मनाचा थरकाप उडत होता. अनिल दामोदर गवई (वय ३०) व भिवा गवई (वय ३२) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही शेतीमध्ये कामधंदा करून आपली उपजीविका भागवत होते. सध्या पाऊस असल्यामुळे शेतामध्ये काम चालत नसल्यामुळे चिखली येथे बाजार करण्यासाठी गेले होते. चिखलीवरून परत येताना एमआयडीसा जवळ भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे अनिल दामोदर गवई हा जागीच ठार झाला, व भिवा गवई यांना चिखली येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले असता, पेशंटची अवस्था खूपच नाजूक असल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे नेण्याचा सल्ला डॉक्टर चिंचोली यांनी दिला. त्यानुसार, त्याला औरंगाबाद येथे एमजीएम रुग्णालयात रात्रीच हलवण्यात आले. त्याची तब्येत सीरिअस असल्याचे सांगण्यात आले.