अई माय आले वाट्टे रे पिंट्या तुये बाबा बजारावून म्या सांगेल सामायन अन् सनावाराचा बजार अन् लाळाच्या लेकराईसाठी भातकं घीवून! ते पाय तेईले धळ सायकलबी उभी करता यीवून नाई रायली. पय पटकन अन् सायकलवरचा बजाराचा झोरा घीवून ये घरात! थांब वं झुळप्यावानाचे बाले, तुले मोठा बाप दिसला का हरीक येते. तु व्हय मांग अन् अय पिंट्या तुबी झोरा आन्याले जावू नोको. आज आपल्या घरचं ‘सोंग’ लयच बिघळेल दिसून रायलं मले! तेईचे सारे ढंगरे माईत हायेत मले जलमभNयाचे. लयच गारुळी मानुस आला माया नसीबात. मीच आनतो झोरा अन् सोंगालेबी झोकाझोकानं आनतो घरात! ‘गारुळ्यााची’ अन् ‘दारुळ्याची’ पुंगी वाजोनं म्हंजे ज्याची कला त्यालेच माईत असते! ते सोपी गोठ नाई का कोन्या यैNयागैNयाचं काम नाई! पुंगी पेटारा घीवून गल्लोगल्लीनं हिंडून सरपमुंगसाचा खेय दाखोनारा, लोकाईच्या खिशातले पयसा काळनारा ‘गारुळी’ अन् बायकोच्या गुळ््यातला गोळ बोलून पयसा काळनारा ‘दारुळी’ हे येकाच मायचे सख्खे अन् सावतर लेकरं असतात! मले हरेक हप्त्याच्या बजाराच्या रोजाचे रट्टेगट्टे, छप्पनरंगी ‘नखरेल’ धंदे मालुम हायेत तुया बापाचे. मी काय तेईले आजची ओयखतो काय? गावातल्या लोकाईले, शेजारीनले तं भलकसा सादासुदा मानुस दिसते अन् घरात पाय टाकल्या बराबर म्हादेवाच्या डोक्स्यातून गरम पान्याची ‘गंगा’ वायते! पोटात ‘गुनवंती’ असली का मीठ्ठूवानी गोळ गोळ बोलून जांब खायाले पायतात अन् घळीभNयानं उतरली का आंगावरची मासीबी सईन व्हत नाई तेईले! तरीबी अस्या आकळेबाज दारुळ्याच्या घरात मीच हो म्हनून टिकली. दुसरी असती तं फयपुâलानं भरेल घराच्या आंगनात हराय पुâटली असती! धरा बरवं लौकर माया हात अन् चला घरात. तो बजाराचा झोरा द्या माया हाती! पायजो अलादी पकळजो, त्यातलं सामायन माया लय कामाचं हाये. वसरीतल्या खुटीलेच अटकोजो. नाईतं नेसील रंधावनातल्या देवाNयात! म्हंजे असं काय आनलं तुमी बजारातून? तु व्हय पुळे मी माया हिसोबानं येतो मांगून!
अई माय, हे काया थैलीतलं काय व्हये नरमनरम अन् या कुप्पीतलं कोन्चं खायाचं तेल आनलं पान्यावानी! हा मोठा पुळा तं लेकराईच्या भातक्याचा हाये मंग म्या सांगेल बाकीचे सौदे कुठी उपयले मायबाई! सांग रे पिंट्या दोन गोठी तुया बापाले समजून. आज सकावून मायाजोळून लाळीगोळी लावून दोन हजाराची नोट देलती तेईले बजाराले. म्हनलं रायत्याचे आंबे, तेल मसाला अन्äा् येकदीळ किलो रसाचे आंबे आनजा, उलीउली झळीपान्याचा दायदाना, उरेल पयस्यात आलु, कांदे, लसन आना असं हाताले चिंकोळा घीवून सांगतलं व्हतं! पन ना रायत्याचे आंबे ना कोन्चा दायदाना आला. वांझोट्यावानी बजाराच्या झाेक्यात काया थैलीतली भाजी, कुप्पी अन् लेकराईले भातकं घीवून डोलत डालत रिकाम्या हातानं आला बयताळ मानुस! सांग चंचोईत लपून ठुयेल पयसा देल्यावरबी असा उटपटांग धंदा करनाNया मान्सावर कसा भरोसा ठुवावं बाईनं? आता कायचं रायतं घालू अन् हप्ताभर लेकराईले काय खावू घालू! किती जुलूम असते बायाईच्या जातीले असा घरंदाज ‘आकळेबाज’ दारुळ्या नवरा भेटल्यावर? लेकराबाकराईच्या तोंडाकळे पावून कोन्चीबी बाई हा दारुळ्या गारुळ्याईचा खेय नाईलाजानं सईन करते! बाईच्या कपायावरचं कुवूâ अन् गयातली पोथ हासीखुसीत असनं हेच तिच्या ‘सौभाग्याचं लेनं’ असते. पन बेअक्कल, घरादाराचं घेनंदेनं नसनाNया दारुळ्या मान्सापायी फुलानं भरेल सोंसाराची राखरांगोई व्हतं नाई काय? म्हनून हरेक बाईच्या डोक्स्यात, दारुळ्या मान्साले कईसा चांगल्या ईचाराची ‘अक्कलदाळ’ फुटीनं हाच ईचार असते…!!
(लेखक हे विदर्भातील आघाडीचे दैनिक देशाेन्नतीचे वरिष्ठ संपादक आहेत.)