CrimePune

जमीन मोजणीस मज्जाव; अंगावर पेट्राेल ओतून घेतले!

चाकण (प्रतिनिधी) : जमिनीची मोजणी करण्याचा तुमचा काही एक अधिकार नाही, तुम्ही येथून निघून जा, असे म्हणत आणि धक्काबुक्की -शिवीगाळ करत शासकीय परिक्षण भूमापकाच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी सात पुरुषांसह चार महिलांवर चाकण पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यावेळी आरोपींनी अंगावर पेट्रोलसदृश पदार्थ अंगावर ओतून घेत पेटवून घेण्याचाही प्रयत्न केला होता.

धनंजय अषोक ठाणेकर (वय.४१ वर्षे,परिरक्षण भूमापक,सोमवार पेठ, पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १) गणेष बाळासाहेब साबळे,२) नामदेव बबन साबळे ३) चांगदेव बबन साबळे, ४) संदीप नामदेव साबळे,५) भरत भाउसाहेब साबळे,६) बाळराजे चांगदेव साबळे, ७) बापू चांगदेव साबळे यांच्यासह चार महिलांना (पत्ता माहित नाही ) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी धनंजय ठाणेकर हे राजगुरूनगर येथे शासकीय जमीन मोजणी भूमापक आहेत.त्यांना राजगुरूनगर दिवाणी न्यायालयाकडून मिळालेल्या हुकूमनामानुसार (दि.२ ) ला साबळेवाडी जमीन गट नं. ४१५,सिद्धेगव्हाण जमीन गट क्र. १७४१७६,१७७,१८२ या जमिनीची शासकीय मोजणी करीत असताना,वरील अकरा जणांनी फिर्यादीस सांगितले की,आम्ही मोजणी करु देणार नाही, तुमचा काही एक संबंध नाही, तुम्ही येथून निघून जा असे म्हणाले,त्यावेळी ठाणेकर यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र वरील अकरा जणांनी मोठमोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करत फिर्यादीचे शर्टाचे कॉलर पकडून धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादीचे मदतनीस विठ्ठल गावंडे याच्या हातातील जिपीएस मशीन हिसकावून त्यास ढकलून दिले. अकरा जणांमधील चार महिलांनी प्लॅस्टिक बाटलीत आणलेले पेट्रोल / डिझेल सारखा ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावर ओतून काडी पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!