चाकण (प्रतिनिधी) : महाळुंगे इंगळे (ता.खेड ) येथे मोबाईल फोन फोडण्याचे कारणावरुन चिडुन जावून दोन परप्रांतीयांमध्ये भांडणातून एकाने दुसऱ्यास (दि.२८ ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फेट्याने व डाव्या हाताने गळा दाबून तसेच लोखंडी तव्याने डोक्यात मारुन जखमी करुन त्याचा खून करून फरारी झालेल्या आरोपीस मध्यप्रदेश येथून पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तिनच्या पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. कालू मंगल रकेवार (वय.२३ वर्षे,सध्या रा.महाळुंगे,ता.खेड,जि. पुणे,मूळ रा.पथरीया,उत्तरप्रदेश ) असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव होते. पप्पू मंगल रकेवार (वय.४० वर्षे ) याने दिलेल्या फिर्यादीवरून रामसिंग सुलतानसिंग गोंड( वय ३० वर्षे मुळ रा. रियाना ता.जि. दमोह,राज्य मध्यप्रदेश, सध्या रा. महाळुंगे ता. खेड जि. पुणे ) याच्यावर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामसिंग याने कालूचा खून करून फरारी झाला होता. गुन्हे शाखा युनिट ३ ने घटनास्थळ परीसरासह चाकण बस स्टॅण्ड, महाळुंगे तसेच पुणे रेल्वे स्टेशन परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपी शोध घेतला. मात्र त्याचा मोबाईल फोन बंद केल्यामुळे तांत्रिक तपास करण्यामध्ये अडचणी येत होत्या.सखोल चौकशी करीत असताना गुन्हे शाखा युनिट ३ चे तपास टिमने राज्यासह अंतरराज्यातील गोपनिय बातमीदाराकडून माहीती प्राप्त करुन रामसिंग हा त्याचे मुळ गावी आला असल्याची माहीती मिळाली, तपास पथकाने आरोपीचे मुळ गावी रियाना मध्यप्रदेश येथे जावून सदर आरोपीची ठावठिकाण्याबाबत गोपनिय माहीती काढून सदर आरोपी रामसिंग हा अंधाराचा फायदा घेवुन शेतामध्ये लपुन बसल्याची माहीती काढुन त्यास ताब्यात घेण्याकरीता जात असताना आरोपीस चाहुल लागताच पळून जात असताना तपास पथकाने पाठलाग करुन शिताफिने रियाना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे,अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड,यदु आढारी, सचिन मोरे, विठठल सानप, ऋलीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, सुधिर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे, महेश भालचिम यांनी केली आहे.