AalandiPachhim Maharashtra

गीताभक्ती अमृत महोत्सवात महिला सक्षमीकरणाला मिळाला नवीन दृष्टीकोन!

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : मातृशक्ती परिषद – गीता भक्ती अमृत महोत्सवात महिला सक्षमीकरणाला मिळाला नवीन दृष्टीकोन या कार्यक्रमाला पूज्य श्री श्री रविशंकरजी महाराज, प्रसिद्ध कार्यकर्त्या श्रीमती राजश्रीजी बिर्ला आणि इतर मान्यवर संत महात्मे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र सरकारचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार अतिथी उपस्थित होते. या सोहळ्यास आर्ट ऑफ लिविंगचे प्रमुख श्री श्री रवी शंकरजी अमृत महोत्सवात आचार्य स्वामी श्री गोविंददेवगिरीजी यांना सद्दिच्छा देण्यासह उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शनास आले होते. यावेळी त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले.

समाजातील महिलांचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांना योग्य तो सन्मान देत प्रोत्साहित करणे यासाठी गीता परिवाराने गीता भक्ती अमृत महोत्सवात आयोजित केलेल्या मातृशक्ती परिषदेने सर्वांमध्ये उत्साहाची लाट पसरली. उत्सवाच्या चौथ्या दिवशी, ७ फेब्रुवारीला झालेल्या या परिषदेत, महिला सक्षमीकरणावर विशेष चर्चा झाली. पवित्र तीर्थ आळंदीमध्ये गीताभक्ती अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भाविकांना प्रथमच ८१ हवन कुडीय महायज्ञ अनुभवायला मिळत आहे. दररोज निरनिराळे यजमान समाजकल्याणासाठी या महायज्ञाचे यजमानपद भूषवित आहेत. २००० हूनही अधिक वैदिकांकडून सतत होणार्‍या पवित्र मंत्र जपातून निर्माण होणारी कंपने हा न भूतो न भविष्यती असा अनुभव आहे.
गीताभक्ती अमृत महोत्सवात उपस्थितांच्या, श्री राम जय राम जय जय राम या जयघोषाने श्रीमद्भागवत कथेच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. भाविकांनी एवढ्या उत्स्फूर्तपणे केलेल्या जयघोषाने प्रत्येक भक्ताची इच्छा परमात्म्यापर्यंत पोहचत असल्याची अनुभूती आली. समाजोन्नती आणि सशक्तीकरणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या विविध क्षेत्रांतील बारा आदरणीय महिलांचा सत्कार करताना सर्वांनाच स्वामीजींचा वात्सल्यभाव दिसून आला. त्यांत श्रीमती लताताई भिशीकर, भाग्यलता पाटसकर, प्रमिला माहेश्वरी, इंदुमती काटदरे, लीना मेहेंदळे, विजया गोडबोले, ललिता मालपाणी, लीना रस्तोगी, कल्याणी नामजोशी, सरोजा भाटे, डॉ. मंगला चिंचोरे आणि मंदा गंधे यांचा समावेश होता. स्वामीजी आणि इतर विशेष पाहुण्यांनी या महिलांचे त्यांच्या निस्वार्थ योगदाना बद्दल कौतुक केले.
परमपूज्य श्री गोविन्ददेव गिरजी महाराज म्हणाले, “आज १२ उल्लेखनीय महिलांचा सन्मान करताना, त्यांच्या अमूल्य प्रयत्नांची आणि परिश्रमाची आपण दखल घेऊया. त्यांचे निःस्वार्थ योगदान हे समाजाच्या कल्याणासाठी आणि आपल्या परंपरेचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.” स्वामी श्री गोविंद देव गिरीजी महाराज, पूज्य श्री श्री रविशंकर जी महाराज, आदरणीय श्री सुधांशुजी महाराज, आदरणीय श्रीमती राजश्रीजी बिर्ला, आदरणीय साध्वी ऋतंभराजी दीदी मा, आदरणीय श्री चिन्ना जियार स्वामीजी महाराज आणि आदरणीय बाबा श्री सत्यनारायणजी मौर्य यांसारख्या पूज्य अध्यात्मिक गुरुंची आणि विचारवंतांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. गीता भक्ती अमृत महोत्सवावर आपले विचार आणि भावना व्यक्त करताना, पूज्य श्री श्री रविशंकरजी महाराज म्हणाले, “तुम्ही संपूर्ण भारतातील संत समाजाला ज्ञानाच्या धाग्यात बांधले आहे आणि हे संत परमात्मा भगवान श्रीकृष्णच आहेत. त्याबद्दल मी स्वामीजींचे आभार मानतो. तुमचा गीता भक्ती अमृत महोत्सव हा योगायोग नसून एक दैवी योजना आहे. आळंदीच्या पावन भूमीवरील या उत्सवातील भक्तीच्या लाटा इतक्या प्रगल्भ आहेत की नास्तिकही त्यांच्या प्रभावापासून लांब राहू शकणार नाहीत.”
भारत माँ की आरती साठी प्रसिद्ध असलेल्या बाबा श्री सत्यनारायणजी मौर्य यांच्या आत्मस्फूर्ती देणाऱ्या ‘भारतमाता आरती’ने या दिवसाचा उच्चांक गाठला. आपल्या अनोख्या पद्धतीने, बाबाजींनी अतिशय सुंदरपणे भारताच्या समृद्ध इतिहासाचे दर्शन घडवले, भारतीय असण्याचे खरे मर्म उलगडले. आपल्या विलक्षण कला आणि संगीत सादरीकरणाने, बाबाजींनी सकारात्मक प्रभाव पाडला, ज्ञान वृद्धिंगत केले आणि सर्व उपस्थितांमध्ये अभिमानाची चेतना जागवली.
गीता भक्ती अमृत महोत्सवाविषयी वेद व्यास प्रतिष्ठान आणि गीता परिवार यांनी आयोजित केलेला गीता भक्ती अमृत महोत्सव हा अध्यात्म, भक्ती, समृद्ध भारतीय संस्कृती आणि देशभक्ती यांचा अद्वितीय संगम आहे. या कार्यक्रमात २००० हून अधिक वैदिक आचार्यांकडून एक दिव्य, अभूतपूर्व भव्य ८१ कुंडीय महायज्ञ केला जात आहे. त्याचबरोबर भागवत कथा, हरिकीर्तन, दैवी पवित्र ग्रंथांचे अखंड पठण ऐकायला मिळेल. ४५० हून अधिक कलाकार रामायण आणि भारतीय संत परंपरांवरील महानाट्य सादर करतील. आपला दैवी वैदिक वारसा, समृद्ध भारतीय संस्कृती आणि भक्ती साजरी करण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.


श्री श्री रविशंकरजी यांची आळंदी मंदिरास भेट

आचार्य स्वामी श्री गोविंददेवगिरीजी यांचे अमृत महोत्सवा निमित्त गीता भक्ती अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या आयोजित नारी शक्ती कृतज्ञता सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास आर्ट ऑफ लिविंग चे प्रमुख श्री श्री रवी शंकरजी अमृत महोत्सवात आचार्य स्वामी श्री गोविंददेवगिरीजी यांना सद्दिच्छा देण्यासह उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शनास आले होते. यावेळी त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले.
यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त अँड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथजी, विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे यांचे हस्ते श्री श्री रवी शंकरजी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थानचे पदाधिकारी यांचे समवेत त्यांनी संवाद साधला. यावेळी देहू देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तम महाराज मोरे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी गीता भक्ती अमृत महोत्सव सभागृहात श्री श्री रविशंकरजी यांचा सन्मान करण्यात आला. श्रीश्री रविशंकर यांनी येथे मार्गदर्शन केले. माऊली मंदिरात हे विश्वाची माझे घर ! श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांचे यांचे तत्वावर येथे काम करण्यास कार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या वेळी देशभरातील गुणवंत नावलौकिक प्राप्त महिला यांनी जे देशात विविध ठिकाणी आपल्या कुटुंबियां वेळप्रसंगी विचार न करता अगदी कोरोना काळातही मोठे समाज कार्य, अध्यामिक कार्य, गीता प्रचार प्रसाराचे कार्य केले. अशा ७५ महिलांचा व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात मंगलमय वातावरणात करण्यात आला.
गीताभक्ती अमृत महोत्सवात नारी सन्मान सोहळा उत्साहात आळंदी येथे प पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ ते ११ फेब्रुवारी पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने गीता परिवार यांच्या वतीने आळंदी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी संजय मालपाणी म्हणाले, या ठिकाणी प पू स्वामी गोविंदगिरी महाराज यांचा ७५ वा जन्मोत्सव गीता भक्ती महोत्सव या नावाने सुरू आहे. अत्यंत प्रगल्भतेने जीवनभर कार्य करणाऱ्या ७५ सेवावर्तींचा सन्मान, ७५ वैदिकांचा सन्मान, ७५ संतांचा सन्मान, ७५ देशभक्तांचा सन्मान असे वेगवेगळे सन्मान आळंदीतील कार्यक्रमात होत आहेत. यातील आज बुधवारी स्त्री शक्तीचा दिवस साजरा केला जात आहे. महिला आपल्या कडे आशा आहेत, ज्या कायमच पडद्या मागे राहतात,आणि काम करत असतात.गीता परिवार ही एक अशी संस्था आहे ,ज्यामध्ये ९५ टक्के महिला काम करतात.
कोरोनाच्या वर्षा मध्ये आशु गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वामीजींच्या आशीर्वादाने प्रेरणेने कार्य केले. घर बसल्या भागवत गीता शिक्षणाचे आयोजन केले. भागवत गीता कश्यासाठी शिकायची तर अर्जुनाला तणाव होता, तसं आपले ही होते .नैराशाने ,भयाने आपण ग्रस्त होतो. भागवत गीता या सर्वातून बाहेर काढते. स्वामींजींच्या द्वारे स्थापन झालेल्या गीता परिवाराच्या माध्यमातून हे ३८ वर्ष कार्य सुरूच आहे. ऑनलाइन कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यात वाढ झाली.१८६ देशांमधले ८ लाख लोक भागवत गीता शिकत आहे. यामध्ये १३ वेगवेगळ्या भाषांमध्ये शिकवले जात आहे.पहाटे ५ वाजता बॅच सुरू होते व रात्री २ वाजता अमेरिकेतील लोकांसाठी बॅच होते.यादरम्यान २२०० झूम क्लासेस रोज होतात.त्या माध्यमातून गीतेचा प्रचार प्रसार सुरू झाले. यामध्ये ८ लाख कार्यकर्ते आहे. त्यात बहुतांश महिला कार्यकर्त्या आहेत. आज मुख्यत्वे महिलांचा सन्मान केला जात आहे. हा जो कार्यक्रम चाललेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्म प्रतिष्ठापना व्हावी.धर्माचा जो अर्थ आहे कर्तव्य आहे ,या दृष्टिकोनातून आहे.संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भगवत गीतेचे प्राचरण करून रूपांतर केले आणि ज्ञानेश्वरी लिहिली. या गीतेचा प्रचार प्रसार संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने सुरू आहे. या पवित्र भूमीमध्ये इंद्रायणीच्या तीरावर माऊलींच्या समाधी जवळ यांना बोलवावं त्यांचा सन्मान व्हावा. यादृष्टीकोनातून गीता महोत्सवाचे आयोजन आहे.
अनेक देशातील लोक हा आळंदीतील गीता महोत्सव पाहत आहे. येथील जी कीर्तन परंपरा आहे , पहिल्यांदा पाहायला भेटली. आपल्या येथे कीर्तनाची श्रेष्ठ परंपरा आहे. ही परंपरा समजली पाहिजे. वारकरी शिक्षण संस्थेतील लहान मोठे येथे किर्तन करतात. येथे हरिपाठ होत आहेत. कीर्तनाचा आनंद ते घेत आहेत. मराठी भाषा समजली नाही तरी टाळ मृदुंगाच्या नादात रममाण होत आहेत. अनेक जण मला म्हणाले त्या नादाने आमच्या मनाला स्पर्श केला. गीता परिवाराचे आशू गोयल म्हणाले, या महोत्सवात पडद्यामागून ज्या व्यक्ती कार्य करत आहे त्यांचा सन्मान येथे करणार आहोत. देशात महत्व पूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान येथे होत आहे.आज मातृशक्तीच्या दिवशी त्या मातेंचा सन्मान येथे झाला. अश्या १३ प्रगल्भतेने काम करणाऱ्या माता शक्तींना येथे आमंत्रित केले आहे. ज्या मातृशक्ती चा सन्मान होणार आहे. त्याबाबत त्यांनीं यावेळी माहिती दिली. गिरीधारी काळे म्हणाले, वेदशास्त्र संवाद हा असा विषय आहे जो गीता महोत्सवात महत्वाचा घेतला आहे. स्वामिनींच्या निर्देशना नुसार ३ गोष्टींचे वेदांचे कार्य करताना त्यांना साध्य करायच्या होत्या. त्यात पहिले होते शब्दाचे रक्षण, वेद मुखोद्गत राहिले नसल्याने त्याचे रक्षण होत नव्हते. त्याकरिता पाठशाळा काढल्या गेल्या. आता पर्यंत दोन अडीच हजार विद्वान समाजाला समर्पित केले. दुसरे अर्थ रक्षण, म्हणजे त्याचे अर्थ कळायला हवे. तिसरा आहे तो सिध्दांत, वैदिक पद्धतीने जीवन जगायचे कसे ? या तीन उद्देशावर त्यांचे कार्य होते.आता वेद रक्षण झाल्यानंतर त्याचा अर्थ सजवून घेणे.त्याच्याबद्दल चर्चा करणे.तसेच त्यांनी वेद, वेदमंत्र,ग्रहण त्याची उच्चार पध्दती, त्याचे महत्त्व याविषयी यावेळी काळे यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!