सिंदखेडराजा (अनिल दराडे) – पदोन्नतीमुळे ग्रामपंचायत कर्मचारी संजय मुळे यांचा उमरद ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी आदर्श ग्रामसेवक लोणार व सिंदखेडराजा तालुक्यात ओळखले जाणारे विनोद सातपुते यांनी उपस्थितांना अंतर्मूख करणारे मार्गदर्शन केले. कठीण परिस्थितीला तोंड देऊन काम करणारे संजय मुळे हे मनमिळावू, व कर्तव्यतत्पर कर्मचारी आहेत. ते आपल्या वृद्ध आईची सेवा करून आपले कर्तव्य बजावतात, अशा कर्मचार्यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा, असे सातपुते म्हणालेत.
सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद ग्रामपंचायतीचे कर्मचारी संजय मुळे यांची पदोन्नती झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच निर्मला पंढरी या होत्या. तर प्रमुख उपस्थितीत आनंदी शिनगारे, प्रभाकर देशमुख, पंढरी उबाळे, अरुण घायवट, दत्तू सानप, जालिंदर गिरी, संतोष गिरी, राजू शिनगारे, गोविंद मुळे, विठ्ठल भांबर्गे यांच्यासह आदर्श ग्रामसेवक विनोद सातपुते हे होते. यावेळी सातपुते आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की संजय मुळे यांनी अनेक कठीण परिस्थितीमध्ये तोंड देऊन परिस्थितीवर मात करून, आपल्या संसाराचा गाडा ओढला. परंतु आज निश्चित त्यांची प्रगती होणार आहे. व्यसनापासून सदैव दूर राहणे, आणि आपल्या अधिकार्यांनी सांगितलेले काम वेळेत पूर्ण करणे, तसेच आपल्या वृद्ध आईची काळजी घेणे अशा व्यक्तिमत्वाचे संजय मुळे हे सर्वांसाठी आदर्श आहेत, असे सातपुते म्हणाले.
आदर्श ग्रामसेवक विनोद सातपुते यांचाही ग्रामस्थांकडून सत्कार!
याप्रसंगी आदर्श ग्रामसेवक विनोद सातपुते यांनी गेली तीन वर्षे गावाला चांगल्या प्रकारे सेवा दिली म्हणून त्यांचासुद्धा गावकर्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष गिरी, बाळासाहेब जाधव यांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला सखाराम गिरी, नरसिंग सोसे, गणेश मुळे, यांच्यासह अनेक गावकरी हजर होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय साहेबराव मुळे, देविदास खजुरे, गोविंद मुळे, विजय मुंडे, सखाराम बोडखे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रभाकर राजे देशमुख यांनी केले.