बिबी (ऋषी दंदाले) – ‘वन बुलढाणा मिशन’चे संस्थापक तथा शाहू परिवाराचे प्रमुख संदीपदादा शेळके यांनी बिबी येथे परिसरातील जनतेशी संवाद साधला. लोकांच्या मागण्यांचा विचार करून, जनतेचा जाहीरनामा तयार केला असून, लोणार परिसराचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
बिबी गावात आगमन होताच त्यांनी गावातील विविध मान्यवरांच्या पुतळ्यांना पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. श्रीराम चौक येथे त्यांचे महिलांनी औक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर बिबी ग्रामपंचायतीसमोर त्यांची सभा पार पडली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून ‘वन बुलढाणा मिशन’ची भूमिका स्पष्ट केली. लोणार तालुक्यातील रायगावनंतर झालेल्या या दुसर्या सभेला जोरदार प्रतिसाद लाभला. जगातील तिसर्या क्रमांकाच्या खार्या पाण्याच्या सरोवरामुळे लोणार जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनले आहे. देश विदेशातील पर्यटक आणि संशोधक लोणारला भेट देतात. त्या तुलनेत या ठिकाणी दर्जेदार सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. या ठिकाणी पाहिजे अशा प्रमाणात पर्यटनाची सुविधा उपलब्ध नाही. वन बुलढाणा मिशन जनतेचा जाहीरनामा ही नवसंकल्पना घेऊन आलो असून, या परिसराचा दर्जेदार विकास करण्याची संकल्पना त्यांनी यावेळी मांडली. आपल्या दौर्यातून जनतेच्या मनातील सूचना जाणून घेत आहोत, आलेल्या सूचनांना एकत्रित करून जाहीरनामा तयार करण्यात येणार आह,े हा असेल ‘वन बुलढाणा मिशन’चा जाहीरनामा, असे ते म्हणाले.
जनतेने ‘वन बुलढाणा मिशन’च्या माध्यमातून संदीपदादा शेळके यांना खासदारकीसाठी संधी दिल्यास ते जिल्ह्याचा कायापालट करून दाखवणार आहेत. शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते असतील, शेतीपंपासाठी २४ तास लाईट असेल, लोकांना एमआयडीसीमध्ये रोजगार असेल, शिक्षणासाठी मुलांना अत्याधुनिक अभ्यासिका, महिलांना स्वतःचा रोजगार मिळावा, शेतीमालाला कापसाला सोयाबीनला हमीभाव मिळावा, असे बरेच प्रश्न संदीपदादा शेळके मांडत आहेत. जनतेने संधी दिल्यास संदीपदादा संधीच सोनं करून दाखवतील, आणि दिलेला शब्द पाळातील, अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे.