– बुलढाण्याचे रामविजय बुरूंगलेकड़े बारामती तर वर्ध्याचे रणजीत कांबळेंकड़े बुलढाण्याची जबाबदारी
– बाळासाहेब थोरातांकडे विखेंची शिर्डी, तर अजितदादांच्या पुण्याची जबाबदारी विश्वजीत कदमांवर!
बुलढाणा/मुंबई (बाळू वानखेडे) – आगामी लोकसभा निवड़णुकीसाठी काँग्रेसही अॅलर्ट मोड़वर असून, राज्यातील ४८ पैकी ४६ लोकसभा मतदारसंघात समन्वयक नेमले आहेत. यामध्ये प्रदेश सचिव तथा बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचे रामविजय बुरूंगले हे बारामती तर बुलढाणा लोकसभेसाठी वर्ध्याचे आमदार रणजीत कांबळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (भाजप) यांच्या शिर्डीची जबाबदारी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर तर अजितदादा पवार यांच्या पुण्याची जबाबदारी विश्वजीत कदम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नारायण राणे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाई जगताप यांना धाडण्यात आले आहे.
लोकसभा निवड़णुकीची अद्याप घोषणा झाली नसली तरी आगामी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सदर घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सर्वच प्रमुख पक्षांची युती, आघाडी बाबत बोलणी सुरू असल्याचे दिसते. परंतु मेळ जमला नाही तर सर्वच मतदारसंघात निवड़णूक लढावी लागणार आहे. त्यामुळे पूर्वतयारी असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने राज्यातील ४८ पैकी ४६ लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयक नेमले आहेत. यामध्ये बुलढाण्यासाठी आ. रणजीत कांबळे, नंदुरबार कुणाल पाटील, धुळे आरिफ नसीम खान, जळगाव श्रीमती यशोमती ठाकूर, रावेर कु.प्रणिती शिंदे, अकोला प्रा.वसंत पुरके, अमरावती चंद्रकांत हांड़ोरे, वर्धा नितीन राऊत, रामटेक ड़ॉ. सुनील देशमुख, नागपूर विरेंद्र जगताप, भंड़ारा-गोंदिया नाना गावंड़े, चिमूर अभिजित वंजारी, चंद्रपूर ड़ॉ .सतिश चतुर्वेदी, वाशिम सुभाष धोटे, हिंगोली अशोक चव्हाण, नांदेड विजय वड़ेट्टीवार, परभणी श्रीमती रजनी पाटील, जालना वजाहत मिर्झा, छत्रपती संभाजीनगर सुरेश वरपुड़कर, दिंड़ोरी डॉ. अनिल पटेल, नाशिक अमित देशमुख, पालघर सुरेश तावरे, भिवंड़ी अनिस अहमद, मुंबई उत्तर मधु चव्हाण, मुंबई उत्तर-पश्चिम अस्लम शेख, मुंबई उत्तर-पूर्व बलदेव खोसा, मुंबई उत्तर-मध्य अमिन पटेल, मुंबई दक्षिण-मध्य अशोक जाधव, मुंबई दक्षिण विरेंद्र बक्शी, रायगड चारूलता टोकस, मावळ हुशेन दलवाई, पुणे विश्वजीत कदम, बारामती रामविजय बुरूंगले, शिरूर रामहरी रूपनवार, अहमदनगर मोहन जोशी, शिर्ड़ी बाळासाहेब थोरात, बीड नारायण पवार, उस्मानाबाद सिध्दाराम म्हेत्रे, लातूर संग्राम थोपटे व सोलापूर लोकसभेसाठी बसवराज पाटील, माढा संजय बालगुडे, सांगली सतेज पाटील, सातारा रवींद्र धांगेकर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशोक (भाई) जगताप, कोल्हापूर पृथ्वीराज चव्हाण, हातकणंगले अॅड. अभय छाजेड यांची समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के.सी वेणुगोपाल यांनी आज (दि.७) सदर नियुत्तäया जाहीर केल्या आहेत.
नरूभाऊंची उमेदवारी धोक्यात!; ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोण मैदानात?