– कॉलर कॉम्प्यूटरच्यावतीने एमएससीआयटी परीक्षेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचाही गौरव
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – पत्रकार हा समाजातील सुख, दु:ख आपल्या लेखनीच्या माध्यमातून उजागर करत असतो, एकंदरीत पत्रकार हा समाजाचा आरसा म्हणून काम करतो. यासाठी तो कोणत्याही मोबदल्याची आस बाळगत नाही. केलेल्या कामामुळे त्याचे कौतुक झाले पाहिजे म्हणजे त्याच्या लेखनीला आणखी बळ येईल, असा आशावाद प्राचार्य अशोक खोरखेड़े यांनी व्यक्त केला.
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील श्री सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार बांधवांच्या हृदय सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षपदावरून अशोक खोरखेड़े बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे विदर्भ संपादक बाळू वानखेड़े, पत्रकार गणेश पाटील, नवल राठोड, सुनिल पाचपोर, उदय पवार, विजय चव्हाण, दशरथ गायकवाड़ यांच्यासह आदिंचा श्री सरस्वती परिवाराच्यावतीने प्राचार्य अशोक खोरखेड़े यांच्यासह शिक्षक बांधव व कर्मचारी वृंदांनी भावपूर्ण सत्कार केला. यावेळी प्रमोद देशमुख, विजय चव्हाण, गणेश पाटील, बाळू वानखेडे, यांनी बातमी मिळवण्यासाठी कसे कष्ट उपसावे लागतात, याबाबतची माहिती आपल्या भाषणातून विशद करत आपल्या सत्काराने कोणी तरी आमची दखल घेतली याबाबत समाधानही व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थी भागवत गायकवाड़ यानेही आपले विचार व्यक्त केले. यावेळी स्कॉलर कॉम्प्यूटरचे वतीने एमएससीआयटी परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या कु.प्रतिभा गणेश पाचपोर, कु. राणी मनोहर अल्हाट, कु. राधिका विठ्ठल हरमकार, कु.चैताली संदीप बलांसे, कु.अनुजा संतोष बुंदे, जय विलास ढवळे, कु. वंशिका रामदास बोरचाटे, गौरव गजानन साबे सह इतर विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. स्कॉलर कॉम्प्यूटरचे संचालक गोपाल बुंदे, अक्षय खंड़ारे तसेच शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरेख संचालन प्रा. गजानन मुंढे व आभार प्रदर्शन शिक्षक चांदोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रतन पवार, साळुबा फोलाने यांच्यासह इतरांनी प्रयत्न केले.