आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : नवदुर्गा नवरात्र उत्सव समितीचे वतीने कार्ला ते आळंदी मार्गे छत्रपती संभाजीनगर या मार्गाने पायी जाणाऱ्या नवरात्र नवदुर्गा ज्योतीचे आळंदी मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर व्यवस्थापन, विविध सेवाभावी संस्थाचे वतीने नवदुर्गा ज्योतीचे आगमना निमित्त स्वागत करण्यात आले. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्री आळंदी धाम सेवा समिती व शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांच्या वतीने नवरात्र दुर्गा ज्योतीचे स्वागत उत्साहात करण्यात आले.
यावेळी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, नमामी इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, शेतकरी बचाव आंदोलन उपाध्यक्ष बाळासाहेब पेटकर, ऋतिक काठोळे, उमेश महाराज बागडे, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था संचालक सचिन शिंदे, श्री आळंदी धाम सेवा समिती सदस्य नितीन ननवरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश नागरे, एम डी पाखरे, अनिल जोगदंड, जागृती नवदुर्गा नवरात्र उत्सव समिती चे पदाधिकारी एकनाथ बाबा मोकासे, ज्ञानेश्वर ओपळकर, रामचंद्र सुरडकर, नाना मोकासे, निवृत्ती टोपे, गणेश मोकासे, बापू मोकासे, शंकर धनवाई, पांडू आप्पा मोकासे, रवी मोकासे, योगेश मोकासे, सुनील गुरळकर, महेंद्र मोकासे, अशोक गुराळकर, बबलू राजे मोकासे यांचेसह सुमारे २०० नवदुर्गा नवरात्र उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ, श्रीफळ व उपरणं देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्रींचे दर्शन महाप्रसाद आळंदी देवस्थानचे वतीने देण्यात आला. नवदुर्गा नवरात्र ज्योत आळंदी मंदिरात प्रदक्षिणा करून छत्रपती संभाजीनगरकडे पायी मार्गस्थ झाली.