बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (राज्यमंत्री दर्जा) या १२ ऑक्टोबरपासून तीन दिवस जिल्हा दौर्यावर येत आहेत. यामध्ये १३ ऑक्टोबररोजी सकाळी ११.३० वाजता महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाद्वारे जनसुनावणी घेण्यात येणार आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर १२ ऑक्टोबररोजी रात्री ८ वाजता बुलढाणा येथे येणार असून, शासकीय विश्रामगृहात येथे मुक्काम करतील. १३ ऑक्टोबररोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेदरम्यान स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी घेणार आहेत. दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान जिल्हास्तरीय आढावा बैठक घेणार असून, सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेऊन शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करणार आहेत. १४ ऑक्टोबररोजी सकाळी १० वाजता जिजाऊ मॉसाहेबांचे जन्मस्थळ सिंदखेड़राजा येथे भेट देवून सोयीनुसार पुणेकड़े प्रयाण करणार आहेत.
महिला आयोगाचे कामाबाबत महिलाच अनभिज्ञ?
विशेषतः महिलांवरील अन्याय, अत्याचार व इतर कामाबाबत महत्वाचा विभाग असलेल्या राज्य महिला आयोगाचे कामकाजाबाबत मात्र सामान्य महिलाच अनभिज्ञ असल्याचे सांगितले जात आहे. महिला आयोगाचे काम काय आहे हे सामान्य महिलांना माहितीच नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. यासाठी महिला आयोगाच्या कामाबाबत जनजागृती होणेदेखील गरजेचे आहे.
———-