Breaking newsBuldanaBULDHANAChikhaliHead linesMEHAKARVidharbha

दारूच्या नशेत तर्राट झालेल्या पीकअप चालकाने कारला ठोकारले; विवाहिता ठार!

– घर जवळ आले असताना काळाने घातला घाला;  दोघे जखमी, दीडवर्षीय मुलगाही बचावला!
– दारूड्या पीकअप ड्रायव्हरची नशा रात्रीपर्यंतही उतरली नव्हती!

सिंदखेडराजा/चिखली (अनिल दराडे) – दारूच्या नशेत तर्र झालेल्या दूध वाहतूक करणार्‍या पीकअप चालकाने आपल्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे चालवून सुरूवातीला एका अ‍ॅपेला धडक दिली. त्यानंतर स्वीफ्ट डिझायर कारला समोरून ठोकारले. यावेळी झालेल्या भीषण अपघातात सासरी परतणारी २२ वर्षीय विवाहिता ठार झाली असून, कारमधील दोघेजण थोडक्यात बचावले आहेत. तर तिचा दीड वर्षाचा चिमुकला सुखरूप आहे. चिखली ते मेहकर रोडवरील माळखेड फाट्यानजीक हा दुर्देवी अपघात घडला. पीकअपचा चालक इतका नशेत होता की सायंकाळपर्यंत त्याची दारू उतरली नव्हती. या नशेड्या चालकामुळे एक हसते खेळते कुटुंब उद््ध्वस्त झाल्याने परिसरात संताप अन हळहळ व्यक्त होत होती.

चिखली तालुक्यातील एकलारा येथील सौ.पूनम राहुल माळणकर (वय २२) ही विवाहिता वडिलांकडे म्हणजेच शेलू, जिल्हा परभणी येथे माहेरी गेलेली होती. दि ११ ऑक्टोबररोजी पूनमला तिच्या सासरी आणून घालण्यासाठी तिच्या वडिलांनी स्विट डिझायर गाडी (क्रमांक एमएच २२ एएम ४८५८) भाड्याने करून तिला आणून घालत असतांनाच ग्राम एकलरापासून केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतर असलेल्या चिखली – मेहकर रोडवरील आमखेड- माळखेड दरम्यान दुपारी साडेबारा वाजता चिखलीकडून मेहकरकडे भरधाव आणि नियंत्रण नसलेल्या स्थितीमध्ये प्रचंड नशेत असलेल्या दुधाचे वाहन महिंद्रा पीकअप (क्रमांक एमएच १७, ०१५१)च्या चालकाने आपल्या नियंत्रणातील वाहन स्विफ्ट डिझायर कारवर धडकवल्याने, या यामध्ये स्विफ्ट डिझायरचा मागील दरवाजा तुटला व पूनम गाडीबाहेर फेकल्या गेली. यामध्ये तिच्या डोक्याला व हाताला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. सुदैवाने तिचा दीड वर्षाचा चिमुकला मुलगा चिकू हा पूनम व तिच्या वडिलांच्यामध्ये बसलेला असल्याने सुखरूप बचावला. अपघातामध्ये सुनील दत्तात्रय रत्नपारखी, सुमित रमेश दायमा दोघेही राहणार सेलू यांना किरकोळ मार लागला, तर स्विफ्ट डिझायरचा चालक हनुमान सुंदरराव काळे हेसुद्धा जखमी झाले आहेत. हनुमान सुंदरराव काळे यांच्या तक्रारीवरून आरोपी शैलेश उत्तम यादव (रा. कवठे महाकाळ, तालुका संगमनेर जिल्हा नगर) या पीकअप चालकाविरुद्ध चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेतले आहे. तर सायंकाळी आठ वाजेपर्यंतसुद्धा आरोपीची नशा कमी झालेली नव्हती. म्हणजेच तो दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गाडी चालवत असतांना किती प्रचंड नशेत असेल त्याची कल्पना न केलेलीच बरी.


स्वीफ्ट डिझायरचे चालक हनुमंत काळेनी सांगितली आपबिती..

स्वीफ्ट डिझायर कारचे चालक हनुमंत काळे यांनी या दुर्देवी घटनेची आपबिती सांगितली. ते म्हणाले, की आमची गाडी ६० ते ७० च्या वेगाने होती. एकलाराकडे येणारे वळण अवघ्या दीड किलोमीटरवर आलेले असल्याने आम्ही सावकाश चाललो होतो. दरम्यान समोरून येणारे महिंद्रा पीकअप डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे असे झकुल्या खात होते. हे आम्ही बघत असतांनाच त्याने आमच्यासमोरील अ‍ॅपेला कट मारून डावीकडे वळण घेतले होते. अशातच क्षणार्धात त्याने आमच्या गाडीकडे वळण घेतले. मी गाडी खूप खाली घेतली मात्र त्याने थेट आमच्या गाडीला धडक दिली, आणि दुर्देवाने अपघात घडला, असे स्विफ्ट डिझायरचे चालक हनुमंत काळे यांनी सांगितले. यावेळी या परिसरातील नागरिकांनी धावपळ करून आम्हाला रुग्णालयात भरती केले. आणि, नशेत असलेल्या त्या चालकाला पकडून ठेवले. या अपघातामुळे एकलारा येथील माळणकर कुटुंबावर दुःखाचे संकट कोसळले आहे.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!