बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शहराच्या जवळच असलेल्या सागवनजवळील धामनदरी येथील श्यामनगर भागात एका घराला आज (दि.१२) सकाळी ११ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत घरातील किमती सामासह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून, सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
श्याम नगरमधील योगेश नामदेव शेळके यांचे घर या आगीत जळून खाक झाले असून, आगीचा लोळ व धूर पाहून जवळचे नागरिक मदतीसाठी धावले. दरम्यान पालिकेच्या अग्निशमन दलानेही घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. अग्निश्यामक दलाचे गजानन गोरे, अब्दूल रियाज, गजानन काळे चालक अनुप खरे, वैभव जाधव, करण बेंडवाल, अभिषेक वाघ व स्थानिक नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याासठी शर्थीचे प्रयत्न केले. या दुर्घटनेत चार दुचाकी, घरातील अन्नधान्य, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, टीव्ही, प्रिâज तसेच इतर संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. जवळपास तीन लाख रुपयापर्यंत येथे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी जावून पंचनामा केला. या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदतीची मागणी पुढे आली आहे.
—————