आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : जालन्यात घडलेल्या घटने मुळे राज्यभर पडसाद उमटत असून आळंदीत देखील सकल मराठा समाजाने आळंदी नगरपरिषद चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक समोर येत तीव्र संताप व्यक्त करीत निषेध आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत मराठा आरक्षण घेतल्या शिवाय रहाणार नाही असा खणखणीत इशारा दिला. यावेळी युवक तरुण संतप्त झाले होते. निषेध आंदोलन करीत घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली. या वेळी आळंदी पोलीस ठाण्याचे वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी ( जालना ) गावात मराठा समाजा तर्फे उपोषण आंदोलन सुरु होते. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात झालेल्या बाचाबाचीत पोलिसांनी लाठी मार केल्याची घटना घडली. यात पोलीस आणि आंदोलक देखील जखमी झालेत. या घटनेचा निषेध राज्यात सर्वत्र सुरु आहे. आळंदीत देखील मराठा समाजाचे वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, युवा नेते उत्तम गोगावले,माजी नगरसेवक रमेश गोगावले, प्रकाश कुऱ्हाडे, अजय तापकीर, आशिष गोगावले, मनोज पवार, अनिकेत डफळ, तुषार तापकीर, मंगेश तिताडे, शशीकांतराजे जाधव, बालाजी शिंदे, रामदास दाभाडे सरकार, चारुदत्त रंधवे, राहुल सोमवंशी, प्रविण घुंडरे, महेश मडके, कामगार नेते अरुण घुंडरे, मराठा क्रांती मोर्चाचे जयसिंह कदम, अजयशेठ तापकीर, मोहन तौर, तसेच अनेक पक्षांचे प्रतिनिधी, सकल मराठा समाज व आळंदीकर ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.
भागवत शेजूळ, श्रीकांत काकडे,ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, मराठा क्रांती मोर्चा आळंदी शहर, समस्त मराठा समाज बांधव, आळंदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध सेवाभावी संस्थांसह विविध पक्षातील मराठा समाजातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) रमेश पाटील, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांचेसह पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्त तैनात करून शांतता सुव्यवस्था कायम रहाण्यास बंदोबस्त ठेवला होता.