आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : गंगा दशहरा सप्ताह निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) मार्फत पर्यावरण प्रकृती विभागा अंतर्गत विविध सेवाभावी संस्थांचे सहकार्याने इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. नदी, घाट ,स्वच्छ करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास आळंदी नगरपरिषदेकडे घंटागाड्यांतून कचरा सुपूर्द करण्यात आला. स्वच्छता अभियान आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटाचे दुतर्फा राबवण्यात आले. यास साधक, सेवकांनी प्रतिसाद देत अभियानात सहभागी झाले.
इंद्रायणी नदी घाटावर यावेळी जल प्रदूषण करणार नाही अशी प्रतिज्ञा सहभागीं सेवकांनी घेतली. श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल विकास सेवा केंद्र ( विश्रांतवाडी, दिघी मॅक्झिन, कळस,आळंदी सेवा केंद्र ) या केंद्रातील सेवेकार्यांसह आळंदीतील विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. इंद्रायणी घाट, मंदिर, आणि सिद्धबेट परिसरात स्वच्छता करण्यात आली. सेवेकरी बांधवांतर्फे नागरिकांना नदी चे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून जागृती करण्यात आली. इंद्रायणी नदी घाटावर राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात विजय लोलम, श्रीनिवास साखरे, मनोज काळे, आनंद फुले, शिवाजी पवार, बालाजी माने, योगेश गुरव, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाउंडेशनचे भागवत काटकर, बंडूनाना काळे, गोविंद ठाकूर पाटील, बाळासाहेब कवळासे, सिकंदर घोडके, माऊली घुंडरे, प्रकाश बँकर, रामदास तितले, प्रवीण म्हस्के, बाळासाहेब खांडेकर, पांडुरंग म्हस्के, बाळासाहेब वायकुळे, गोविंद मुंडे, प्रणय करे यांचेसह मोठ्या संख्येने सेवेकरी बांधव आणि महिला भगिनी यांनी सहभाग घेतला. यावेळी महिलांचे हस्ते इंद्रायणी नदीची पूजा करून वस्त्र अर्पण करण्यात आले. यावरी नाम जय घोष उत्साहात करण्यात आला. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी नगरपरिषदेची घंटागाडी, ट्रॅक्टर वाहने उपलब्द्ध करून दिली.
गुरुवर्य परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने व आदेशाने, पर्यावरण प्रकृती विभाग अंतर्गत गंगा दशहरा सप्ताह निमित्ताने नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पुणे जिल्ह्यातील देहू ,आळंदी इंद्रायणी नदी, सांगवी, चिंचवड येथील पवना नदी तसेच तुळापूर येथील संगम अशा विविध ठिकाणी दिवसभरात नदी स्वच्छता उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.