सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – नुकत्याच जाहीर झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रथम वर्ष प्रथम सत्र अभियांत्रिकीच्या निकालामध्ये सोलापूर सिंहगडची तेजा वसंत शेवाळे ‘ हिने ९६ टक्के गुण मिळवून सोलापूर विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला.
तेजा वसंत शेवाळे हिने इंजिनीअरिंग माथेमँटिक्स व इंजिनीअरिंग केमिस्ट्री या दोन विषयामध्ये ७० पैकी ७० गुण मिळवले. तसेच विशाल कुंडलिक मोटे हा विद्यापीठात तृतीय व अंबादास शंकर गोटे हा विद्यापीठात चतुर्थ क्रमांक पटकवाला. विद्यापीठाच्या गुणांनुक्रमे पहिल्या ५ मध्ये सोलापूर सिंहगडच्या ३ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे तसेच प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. विनोद खरात यांच्या हस्ते सत्कार करून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पालक व विद्यार्थ्यांच्या विश्वासास पात्र राहून महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे, त्याबद्दल महाविद्यालयाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.