उरे हायेत काय हो हेळगुरजी शाळेच्या हाफीसात बसेल का गेले वारानी हिंडाले! उरे यानाहो जानरावभौ डायरेक अंदरच्या खोलीत. बसा घळीभर खुर्चीत! आता तुमीच शाळा समितीचे अध्यक्ष असल्यावरबी बयादाटून हेळगुरजीच्या नसत्या चवकशा करता! तुमालेबी हाफीसाच्या अंदर याले कोनाले ईचारा लागते काय बावा! येकतं तुमी म्हंजे लयच अरकाट अन्äा् वजनदार मान्सं हा ना या गावचे! ‘काम कवळीचं नाई अन् सोताले बाबुराव म्हनाची घाई’! उरे आपलं गावचं नाई तं शेजचे पासकोसातले गावबी थरथर कापतात ना तुमच्या नावानं जानरावभौ पाठीमांगलागे! तुमच्या ‘अळनावातच’ सारी ताकद लपेल हाये ना बावा!
काय ते बगळ्यावानी पांढ्ढेबक्क कपळे, काय ते साधुवानी वाळोयेल काईभोर दाळी, काय तो तोंडात लोंगईलायचीचा पानाचा ईळा, काय ते सरक्या रस्त्यानं तिरपं तिरपं हेकोळं चालनं म्हंजे येखांद्या युगपुरषाचा अवतारच समजा लागते! पंजाबी ड्रेसातला चुळीदार पयजामा, टोंगयाच्या खाली लंबकनारा नेहरु चाच्यावानी सदरा, पायात पाखराच्या चोचीवानी बुट, डोक्स्यात पांढीबक्कं टोकबाज टोपी, सा पूâट भळाच्या धांड्यावानी उंची अन् छाती छप्पनर्इंची! मंग अशा पहाळावानी मान्साले डोयापुळे पायल्यावर कोन्त्याबी मान्साचे आठाने हारपतातच ना! बरं हा तुमच्या पोथीपुरानाचा अध्याय अतीच बंद करतो. सांगा आता काय घेता! च्या-कॉफी, थंडगरम पानी का न्यायरीले आलुबोंडे समोसे बलावू! नाईतं झळीपान्याचे त्या खिचळी शिजोनाNया बाईलेच गरम कांदा भजे तयाले लावू? ते खा-प्याचं संध्याकाई पावून घीवू हेळगुरजी. पयले शाळेत नाव टाक्याचं रजिस्टर बलावा. मायाच नातीचं नाव टाक्याचं हाये. अय तुयसीराम बाबु ते नोंदवही आन बरं मायाजोळ! थांबा चष्मा लावू द्या डोयाले. सांगा बरं तुमचं नाव जानरावभौ. उरे काहून चेंढायन्या करता गुरजी. मायं नाव काय तुमाले मालुमच नाई! तुमचं नाव नाई ईचारलं ना म्या, तुमच्या नातीचं ईचारलं! येवळे राजा शाळा समितीचे अध्यक्ष असल्यावरबी अळान्यावानी धोरनं ठुयता! हं लीवा बरं फटालकन.. ईळीबाई बेधळकराव पाठीमांगलागे. वय सात साल, जलमतारीख लीवा पंचवीस मे दोनहजार चवदा! नाव डबल सांगा, मले आयवूâ नाई आलं बराबर. ई..ईळी…बाई, आयकु आलं आता?
क… काय… ईळी,…ऽऽ ब… बाई…!
कामून हो गुरजी तुमची बोबळी वयली अन् सारं आंग थरथर कापून रायलं, कपायावर घाम पुâटला तुमच्या!
त… तसं क… काई नाई ज… ज.. जानरावभौ, पन ‘ईळी’ शब्द कानावर आदयला का कोन्च्याबी मान्साची दातखयीच बसते ईतल्यात! झपीतल्या सपनात जरी ईळीचं नाव आयकलं तरी मानुस सातरीतून दचवूâन उठून बसते. तुमी तं बावा डायरेक आपल्या शाळेत ईळीचं नाव टाकलं! अजाबच नाव ठुलं राजा नातीचं. ‘ईळी बेधळकराव पाठीमांगलागे’! आनीन ना शाळेच्या घरावर गोटे हे तुमची सोनचिळी ईळी! संग आनलं काय तिले? नाई मी संग नसतो वागोत तीले. बेज्या पाजी हाये ना ते. फक्त माया वांगल्याचांगल्या कामात कोन आळवी टांग टाकली का ईळीले गुपचाप त्याच्या आंगावर छिवाळून देतो! मंग वयवय करनाNयाची ईळी तीच्या किल्लीनं त्याच्या तिजोरीचं कुलूप उघळते अन् दोन नंबर काया धनाची आपोआप बदबद चक्कीतल्या पीठावानी धार पळत रायते!
बरं माई सोनचिळी ईळी कामाले तं येवळी अरकाट हाये का येखांद्याच्या मानगुटीवर बसली का त्याले चोवीस तास घाम फोळत रायते! तीले खा-प्याले सादंसुदं आवळत नाई. फिNयाले गेली तं झाळझुळपं, नदीनाले, हिरवेकच्च पहाळं असा सोर्गातल्या र्इंद्राच्या दरबारावानी गोळघाटीचा बंगला अन् कमळाच्या पुâलाचं सुगंधाचं वातावरन पायजे! म्हनून तं मोठमोठ्या आयत्या धनावरचे नांगोबा ईळीले, पायल्याबराबर यैन वखतावर दिसील त्या बीळात घुसून गायप व्हतात! वदरुन दिसाले सोनचिळी हाये म्हनून तिच्या बापानं म्हंजे बेधळकरावनं तिच जलमनाव सोनचिळी निंगालं तरी लाळानं ‘ईळी’ ठुलं! म्हनून तिचं नाव आयवूâन भारतातले दसनंबरी रथीम्हारथी तिजोNया खाली करतात! मानुस कितीकई मोठ्या पदावर असला तरी दोन नंबरच्या काया धनाले हे ईळीची सोनचिळी उधईची किळ लावतेच! येकखेप ईचवाच्या नांगीवानी टोचकनी दिवून घायल केल्यावर तो तिची जलमभर आठोन ठुते! आखीन ईळीचे कारनामे सांगू काय तुमाले का बसं करु माया सोनचिळीवानी ईळीची पोथी! कपायावरचा घाम पुसा पयले हेळगुरजी अन् मलेबी निचंतीनं कानातली बीळी चेतू द्या…!!
(साभार – दैनिक देशाेन्नती. लेखक हे विदर्भातील आघाडीचे दैनिक देशाेन्नतीचे स्तंभलेखक असून, प्रसिद्ध वर्हाडी साहित्यिक आहेत.)