Breaking newsChikhaliCrimeHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

फसवणूक, विश्वासघातप्रकरणी माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रेंसह वडिल, काकांवर गुन्हे दाखल

– अकृषक नसतानाही अकृषक असल्याचे सांगून भूखंड जादादराने विकला
चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – चिखली शहरातील पुंडलिक नगरमध्ये माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे परिवाराकडून जमीन विकत घेतल्यानंतर काही दिवस त्याची ७/१२ वर नोंद झाली नाही. त्यानंतर खरेदी घेतलेल्यापैकी विजय वाळेकर यांनी सातबार्‍यावर नोंद होण्यासाठी तलाठी कार्यालयात खरेदीखत दिले असता, सदर भूखंडावर मूळ मालकाने बँकेचे कर्ज घेतल्याचे निर्दनास आले. मूळ मालकाला याबाबत वारंवार सांगूनदेखील त्यांनी याबाबत टाळाटाळ केली. अखेर दि.५ जुलैरोजी वाळेकर यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरुन माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे यांच्यासह त्यांच्या परिवारातील वडील व दोन काका असे चौघांविरोधात चिखली पोलीसांनी फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत विजय वाळेकरसह एकूण ५७ लोकांनी निवेदनाव्दारे तहसीलदार, चिखली यांचेकडे दोषीवर कार्यवाही होऊन सातबारामध्ये नोंद होणेबाबत निवेदनदेखील दिले होते.
सविस्तर असे, की दि.३१ डिसेंबर २०१२ रोजी विजय वाळेकर यांच्या आई सौ. ज्योती भगवान वाळेकर यांच्या नावावर असलेल्या चिखली न. पा. सर्व्हे नं. १०३ /५ मधील उपविभागीय अधिकारी बुलडाणा याचे फाईल क्रमांक श. प्र. का. एन ए.पी. ३६/ चिखली /१५९/२००३/२००४ दि.२९/१२/२००३ नुसार बिगर शेती वापरात केलेली खुली जागा लांबी २८ फुट रुंदी १४ फुट असे एकूण ३९२ चौ. फुट क्षेत्रफळाची जागा शेख अर्शद शेख इसराईल रा. चिखली यांचेकडून खरेदी केली होती. तसेच शेख अरशद शेख इसराईल याने वर नमुद जागा/प्लॉट मारोती गोविंद गोडवे यांचेकडून घेतला आहे, मारोती गोविंद गोडवे यांनी ही जागा प्रदिप पितांबर वाळेकर रा. चिखली यांचेकडून विकत घेतली आहे. प्रदिप पितांबर वाळेकर यांनी ही जागा प्रकाश चंपकराव देशमुख यांचेकडून घेतली असून, प्रकाश चंपकराव देशमुख यांनी ही जागा विश्वभरआप्पा मार्तंडआप्पा बोंद्रे यांचेकडून खरेदी करुन विकत घेतली आहे. सदर प्लॉटची खरेदी करतेवेळी उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयीन आदेश रा. प्र. का. एन. ए.पी. ३६/ चिखली १५९/२००३/२००४/२९/१२२००३ नुसार मारोती गोविंदा गोडवे यांचे नावे अकृषक आदेशाची प्रत खरेदीची वेळी जोडण्यात आली होती. मी विकत घेतलेल्या सव्हें नं १०३/५ जागेचे मूळ मालक सुरेशआप्पा विश्वंभर आप्पा बोंद्रे, सुभाषआप्पा विश्वभरआप्पा बोंद्रे, काशिनाथआप्पा विश्वंभर आप्पा बोंद्रे रा. चिखली हे आहेत. रामभाऊ लक्ष्मण खंडारे, गोपाल कळसकर, सतिष गणेश तळेकर यांच्यासह अनेकांनी त्यांचेकडुन प्लॉट खरेदी केलेले असल्यामुळे त्यांचेसुध्दा प्लॉटची सातबारामध्ये नोंद होत नव्हती. म्हणून सर्वांनी एकत्रित येवून तलाठी व मंडळ अधिकारी यांचेकडे वारंवार नोंदीसाठी तलाठी यांना सांगितले. परंतु तलाठ्यांनी तुम्ही विकत घेतलेली जागेची सातबारामध्ये नोंद नसून ती जागा एका बँकेकडे जागेचे मूळ मालक सुरेश आप्पा विश्वंभरआप्पा बोंद्रे, सुभाष आप्पा विश्वंभरआप्पा बोंद्रे, काशिनाथ आप्पा विश्वंभर आप्पा बोंद्रे या तिन्ही भावांनी तारण दिलेली आहे. सदर जागेवर त्यांनी कर्ज घेतलेले आहे. तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सांगितले की नमूद प्लॉट हे अकृषक झालेबाबत आदेश नाहीत, असे सांगितले.
वाळेकर यांनी सदर नागरिकांना घेऊन सुरेशआप्पा विश्वंभरआप्पा बोंद्रे, सुभाष आप्पा विश्वभर आप्पा बोंद्रे, काशिनाथ आप्पा विश्वंभरआप्पाा बोंद्रे यांच्या वारंवार भेटी घेवून जागा आमच्या नावावर करून देणेबाबत विनंती केली. परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस टाळाटाळ केली. विजय वाळेकर यांनी माहिती अधिकाराव्दारे अर्ज करुन उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांचे कार्यालयांत अकृषक आदेशाची प्रत मिळणेबाबत अर्ज केला असता, कार्यालयाकडुन नमुद आदेश रेकर्डवर आढळुन आला नाही, असा रिपोर्ट दिला आहे. त्यावरून नमुद सर्व्हे नं १०३/५अकृषक झाले नसल्याचे समजले. जागेचे मुळ मालक सुरेशआप्पा विश्वंभरआप्पा बोंद्रे, सुभाषआप्पा विश्वभर आप्पा बोंद्रे, काशिनाथ आप्पा विश्वंभरआप्पा बोंद्रे यांनी चिखली येथील सर्व्हे नं. १०३/५ मधील प्लाट अकृषक असल्याचे सांगून जास्त पैसे घेवून प्लटची विक्री केलेली आहे. तसेच बँकेस सर्व्हे नं. १०३/५ मधील प्लॉट चे गहाण खत करुन कर्ज घेऊन लोकांची फसवणूक केली आहे. कृणाल सुभाषआप्पा बोंद्रे रा. चिखली खडकपुरा यांनी विक्री करुनदेखील त्याच सर्वे १०३/५ वर चे दुय्यम निबंधक दस्त क्र १६०० दि.३०/०३/१७ प्रमाणे गहाण खत तयार करून त्यावर दोन करोड रुपये कर्ज उचल केला आहे. विक्री केलेली असतानादेखील त्याच जमिनीवर कर्ज घेवुन परस्पर गहाणखत करून देवून प्लॉटधारकासह बँकेची देखील फसवणूक केली आहे. त्यामुळे हे प्लाट नावावर होत नाहीत. ज्यांनी सर्वे न १०३/५ मध्ये प्लॉट खरेदी करून दिले, त्याची सुरेश आप्पा विश्वंभरआप्पा बोद्रे, सुभाषआप्पा विश्वभरआप्या बोंद्रे, काशिनाथआप्पा विश्वभर आप्पा बोंद्रे व कुणाल सुभाषआप्पा बोंद्रे रा. खडकपुरा चिखली यांनी संगनमत खोटे अकृषक आदेश तयार करुन जास्त दराने भूखंडाची विक्री करुन आमच्याकडुन पैसे घेतल्याची तक्रारीवरून फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी सुभाषआप्पा विश्वभरआप्पा बोद्रे, सुरेशआप्पा विश्वमभरआप्पा बोद्रे, काशिनाथ विश्वंभरआप्पा बोंद्रे, कुणाल सुभाषआप्पा बोंद्रे, रा. खडकपुरा चिखली यांच्याविरोधात विजय भगवान वाळेकर यांच्या फिर्यादीवरून अप नं ५७८/२०२२, भादंविच्या ४२०,४२३,४६५,४६८,४७१,४०६,१२०-बि कलानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सपोनि अमोल बारापात्रे हे करत आहेत.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!