लाेणार (ब्रेकिंग महाराष्ट्र) – लोणार-तालूक्यातील कुंडलस येथे घराला आग लागून एक जणाचा जागीच जळून मृत्यु झाल्याची दूर्देवी घटना दि.५ जूलैच्या मध्यरात्री २ वाजेदरम्यान घडली.
कुंडलस येथील ६० वर्षीय माजी पोलीस पाटील असलेले एकनाथ शंकर काकडे हे घरात जेवन करुन एकटेच झोपलेले असताना दि.६ जूलैच्या राञी अचानक आग लागल्याने आजूबाजूला रहात असलेल्या नागरींकांना जाग आली. आग विझविण्यासाठी गावातील नागरीकांनी प्रयत्न केले. पण आग आटोक्यात आली नाही. अग्नीश्यामक दलाला पाचारणही करण्यात आले पण तोपर्यत घरातील साहीत्य स्कुटी गाडी सह मृतक एकनाथ शंकर काकडे जळुन खाक झाले. या आगीत अंदाजे १ लाख २५ हजार रुपयाचे नूकसान झाले. सदर घटनेची फिर्याद नागेश महादेव काकडे वय ५० यांनी पोलीस स्टेशनाला दिली. पोलीसांनी १७४ जाफौ मर्ग दाखल केला आहे. घटनेची माहीती मिळताच घटनास्थळावर बिट जमादार बन्सी पवार , पोकाँ कृष्णा निकम, पोकाँ गजानन ठाकरे यांनी पंचनामा केला. अग्नीश्यामक दलाचे आशोक निचंग, अशोक मादनकर व कर्मचारी गावातील नागरींक उपस्थीत होते.