बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) जिल्ह्यात कोरोना वाढत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 711 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 696 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 12 तर रॅपिड चाचणी मधील 03 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोग शाळेतील 51 तर रॅपिड टेस्टमधील 645 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 696 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 8, सि. राजा तालुका : पिंपरखेड 1, नांदुरा शहर : 4, पर जिल्हा : जाईचा देव ता. भोकरदन 1, कवठा ता. बाळापूर 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 15 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. तसेच उपचारांती 1 रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 823567 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98409 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98409 आहे. आज रोजी 158 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 823567 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 99266 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98409 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचा उपचार घेत असलेला 169 रूग्ण आहे. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.