मेरा बु , ता. चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) : इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेली कु. लक्ष्मी उर्फ स्वाती या विद्यार्थ्यांनीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली . ही घटना ६ जुलै रोजी अंत्री खेडेकर येथे घडली . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्री खेडेकर येथील रहिवाशी असलेले मधूकर सरकटे यांची मुलगी गोदावरी हीचे सा . खेर्डा येथील संजय गवई यांच्या सोबत लग्न झाले होते . त्यांना एक स्वाती नावाची मुलगी व दोन आहेत . परंतू गेल्या सहा महिन्यांपूर्वी तिच्या पतीने ती झोपेत असतांना तिच्या डोक्यावर पाटा टाकून खून केला होता . त्यामुळे संजय गवई हे जेल मध्ये असल्याने त्यांची दोन मुले व एक मुलगी स्वाती हे आजी आजोबा कडे अंत्री खेडेकर येथे राहत असे . अंत्री खेडेकर येथे राहूनच सा खर्डा येथील शाळेत १२ वी मध्ये शिक्षण घेत होती . दिनांक ६ जुलै रोजी सकाळी घरामध्ये आजी स्वयंपाक करीत होती आणि मुलगी कु लक्ष्मी उर्फ स्वाती ही काही क्षुल्लक कारणावरून रागाने घाराबाहेर गेली तिच्या पाठीमागे मुले तिला थाबविण्यासाठी धावत होती . कु स्वाती ही धावत गावातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या विहिरीवर गेली विहिरी उडी मारणार तेवढ्यात पाठीमागच्या मुलांनी तिला पकडले होते. मात्र तिने मुलांच्या अंगावर रागाने धावून झटका मारुण विहिरीत उडी घेतली . त्याच पाठोपाठ मुलांनीही विहिरीत उडया घेतल्या .
आरोग्य विभागाचेही डॉक्टर व कर्मचारी दवाखान्यात रुग्णावर उपचार करीत असल्याने बाहेरचा आवाज त्यांच्या पर्यत पोहचला नाही . मुलांनी बराच वेळ पाण्यात शोध घेतला मात्र मुलगी विहिरीच्या एका कपाऱ्यात गेल्याने मुलांना विहिरीतून बाहेर काढता नाही . आणि विद्यार्थ्यांनीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला . या घटनेची माहिती उपसरपंच भास्करराव मोरे यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दिली . माहिती मिळताच ठाणेदार गणेश हिवरकर , दुय्यम ठाणेदार वासाडे , उगले , सोनकांबळे , झिने , पोफळे , वाघ , गवई घटनास्थळी धाव घेवून पंचासमक्ष पंचनामा करुण मर्ग दाखल केला आहे.