MaharashtraMarathwadapachodPolitical NewsPolitics

पैठण तालुक्यातील शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी : आ.भुमरे

पाचोड (विजय चिडे) – पैठण तालुक्यातील जनता बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित असून आम्ही बाळासाहेबांचे विचार व तत्वे पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे, त्यामुळे तालुक्यातील सर्व शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पाठींशी असुन आगामी काळात या उठावाचा निवडणूकीवर परिणाम होणार नाही , पुर्वीप्रमाणेच जनतेचे प्रेम कायम आहेत असे, प्रतिपादन राज्याचे माजी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री ‘तथा’ पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी बुधवारी त्यांच्या जन्मगावी पाचोड ता.पैठण येथे केले आहे.

नवीन सरकार स्थापने नंतर पहिल्यांदाच पैठण तालुक्याचे आमदार संदीपान भुमरे यांचे पाचोड ता.पैठण येथे आगमन झाले. त्यानिमित्ताने पाचोड परिसरातील भुमरे समर्थकांवतीने त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम पुष्पहार घालून, फटाक्यांची अतीषबाजी करून गुलाल उधळून आमदार भुमरे यांचे मोठ्या उत्साहात पाचोडमध्ये स्वागत करण्यात आले. गतपंधरा दिवसापासून राज्यात सत्ता संघर्ष आणि राजकीय ओढतान सुरु होते. त्याच निमित्तने शिवसेने मधून फुटलेले शिंदे गटात यांचा समावेश होता.  त्या अनुषंगाने मागील दोन आठवड्या पासून आमदार संदीपान भुमरे हे शिंदे गटासोबत बाहेर होते.  नुकतेच विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे मतदार संघात आगमन झाले.  यावेळी आमदार भुमरे पाचोड येथे बोलतांना म्हटले की, संपूर्ण पैठण तालुक्यातिल शिवसैनिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत. मुख्यमंत्री जे आदेश देतील त्यानुसार आम्ही तालुक्यात काम करूत,आम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत कुठल्याही दडपनामूळे गेलो नाही तर आम्ही स्वखुशिने त्यांच्यासोबत गेलो होतो.

शिवसेनेतुन बंडखोरी केल्यानंतर आ.भुमरे प्रथमच जन्मगावी पाचोड येथे आले होते.  आमदार भुमरे हे येथे येणार असल्याचे समजताच तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी येथील ग्रामपंचायतसमोर सकाळपासुनच गर्दी केली होती. आ. भुमरे यांचे दुपारी एक वाजून दहा मिनीटाने येथे आगमन झाले. आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व ढोलताशा च्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यानी स्वागतासाठी येतांना सोबत पुष्पहार व शाली आणल्या होत्या. तब्बल दीड तास कार्यकर्त्याच्या शुभेच्छा व स्वागत स्विकारून त्यांनी सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यासोबत चहा घेत चालू राजकारणावर गप्पा मारल्या.  याप्रसंगी त्यांनी आपण पन्नास लोकांनी केलेला उठाव हा जनतेच्या हितासाठीच केला असुन आपण सेनेसाठी सर्वस्व पणाला लावले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेला उठाव सर्वांच्याच हिताचा ठरणार आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत कुठल्याही दडपणामूळे गेलो नाही, तर आम्ही स्वखुशीने गेलो .आम्ही सर्वांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले आहे. यापुढे त्याच्याच नेतृत्व व आदेशाने आपण जनतेचे कामे करणार असून जनतेच्या सेवेसाठी कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी सरपंच शिवराज भुमरे, कृषी बाजार समिती सभापती राजू भुमरे,  पंचायत समितीचे उपसभापती कृष्णा भुमरे, उपसरंपच शिवाजी भालसिंगे, वडजीचे सरपंच भाऊसाहेब गोजरे, पाचोड खुर्दचे उपसरपंच नितीन वाघ, जिजा भुमरे, दत्ता भुमरे, जयकुमार बाकलीवाल, राहुल नरवडे,  भागवत नरवडे, अंबादास नरवडे, एकनाथ जाधव,  भागवत भुमरे,  किशोर शिंदे,  रविंद्र फासाटे , श्रीकृष्ण कांबळे,  दिनकर मापारी,  अजिज पटेल, नवनाथ कळमकर, अन्सार पटेल, डॉ.भगवान तांगडे, कमलाकर एडके, परसराम हजारे,  डॅा. दीपक भुमरे, अरुण कळमकर, सय्यद लतीफ, लतीफमामु,  रहीम बागवान यांच्यासह तालुक्यातील ठिकठिकाणी आ.भुमरे यांच्या समर्थकांने त्यांचे जंगी स्वागत केले. या स्वागत समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचे आमदार  संदीपान भुमरे यांनी मनापासून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!