बिबी (ऋषी दंदाले) – भुमराळा येथील हॉटेल निसर्गमध्ये अवैध दारूची विक्री होत असल्याची बाब उघडकीस आली असून, बिबी पोलिसांनी छापा टाकून देशी-विदेशी दारूचा तब्बल १२ हजार १९० रूपयांचा साठा जप्त केला आहे. परिसरातील हॉटेलवर अवैध दारूविक्री झाल्यास कठोर कारवाईचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेले आहेत.
शनिवारी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी हॉटेल निसर्ग येथे बिबी पोलिसांना धाड टाकली. या धाडीत आरोपी राजेश साहेबराव माळोदे (वय वर्ष ४१) राहणार भुमराळा याला पोलिसांनी ताब्यात घेऊन देशीविदेशी दारूसाठा जप्त करून एकूण रुपये १२ हजार १९० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन बिबी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल कायंदे हे पुढील तपास करत असून, या कारवाईने अवैद्य धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.