विरोधक ‘गद्दारी अन् खुद्दारी’वर लढत असताना ऋतुजाताईंनी मात्र शेतकरी व विकासाच्या मुद्द्यावर घेतली प्रचारात बाजी!
- शेतकर्यांची लूट, जातीयवाद, गुंडगिरी मोडित काढण्यासाठी मतदार ऋतुजाताईंच्या पाठीशी एकवटले!
– मेहकर-लोणार मतदारसंघात परिवर्तनाची लाट; ‘चेहरा नवा, बदल हवा’ भूमिकेवर तरूणवर्ग ठाम!
– आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते, सिंचनासाठी कोट्यवधींची तरतूद असतानाही कामे करण्यात आलेले अपयश लोकप्रतिनिधींना भोवणार?
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – विधानसभेसाठी मेहकर-लोणार मतदारसंघात दुहेरी नाही तर चौरंगी लढतीचे चित्र आहे. शिंदे गटाचे उमेदवार डॉ. संजय रायमुलकर, ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात, वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. ऋतुजाताई चव्हाण व मनसेचे भैय्यासाहेब पाटील असा चौरंगी सामना येथे असताना, शेतकरीप्रश्न व विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी फक्त डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे ठरवलेले दिसून येते आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्मातून तसेच गावखेड्यातून त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत असून, किमान लाखाच्या लीडनेच त्यांना विधानसभेत पाठवण्यासंदर्भात मतदार खुलेपणाने बोलत आहेत.
हा मतदारसंघ बालेकिल्ला असतानाही लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना मेहकर-लोणार मतदारसंघातून फारसा लीड घेता आला नाही. आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्यावरील लोकांची नाराजी त्यामागे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहाता, राज्यातील महायुती सरकारने शिंदे गटाच्या आमदारांना भरभरून निधी दिला होता. बुलढाणा, चिखली येथे जोरदार विकासकामे झालीत, मात्र मेहकर व लोणार तालुके हे नेहमीप्रमाणे उपेक्षितच राहिले. मेहकर शहरातील पाणी पुरवठ्यासाठी ७४ कोटी, अमृत योजनेचे ३८ कोटी, लोणार तालुक्यातील पाणी पुरवठ्यासाठी १७१ कोटी रूपयांची तरतूद सरकारने केली होती. इतका मोठ्या निधीची तरतूद करूनही लोकप्रतिनिधीला पाणीप्रश्नी लोकांना दिलासा देता आला नाही, म्हणून या दोन्ही तालुक्यांतील लोकांत नाराजी आहे. या शिवाय, मतदारसंघातील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. मोजकेच रस्ते झाले असून, अनेक गावांतील रस्त्यांची वाट लागली आहे. जेव्हा की मेहकर व लोणार तालुक्यातील रस्त्यांसाठी सरकारने १४४० कोटींच्या निधीची तरतूद केली होती. रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधा गेल्या २५ वर्षांतही झालेल्या नाहीत, त्यामुळे जनमाणसांत कमालीचा राग असून, त्यामुळे मतदारांनी उच्चशिक्षीत व शेतकरी चळवळीतील नेतृत्व विधानसभेत पाठविण्याची खूणगाठ मनात बांधलेली आहे.
सिंचन कालव्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी येऊनही हे कालवे होऊन सिंचन वाढू शकले नाही, मतदारसंघात लोडशेडिंगचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. वास्तविक पाहाता, मेहकर व लोणार तालुक्यांत राज्य विद्युत मंडळाच्या विविध योजनांसाठी १३५ कोटींच्या आसपास निधी आला तरी, अनेक गावांतील डीपीचा प्रश्न, लोडशेडिंगचा प्रश्न सुटू शकलेला नाही. शेतकर्यांना अद्याप पीकविमा मिळालेला नाही, शेतनुकसानीच्या मदतीपासून अनेक शेतकरी वंचित आहेत. लाडक्या बहीण योजनेपासून अनेक महिला अद्यापही वंचित राहिलेल्या आहेत. सोयाबीन व कापसाला भाव नाही. उत्पादन खर्चाइतकाही भाव मिळत नाही म्हणून शेतकरी हतबल झालेला आहे. तब्बल तीन वेळा आमदारकी मिळूनदेखील मेहकर-लोणार तालुक्याचा विकास विद्यमान आमदारांना करता आला नाही. येथील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसीदेखील आणता आली नाही. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ, तरूणवर्ग, महिला असे सर्वच घटक विद्यमान लोकप्रतिनिधीवर कमालीचे नाराज आहेत. तर उबाठा गटाचा उमेदवार हा मतदारसंघाबाहेरील असल्याने निवडणूक झाल्यानंतर त्यांना शोधायचे कुठे? असा प्रश्न मतदारांना पडलेला आहे. सद्या तरी या उमेदवाराला ‘आउट ऑफ रेस’ मानले जात आहे. त्यामुळे येथे खरी लढत ही ऋतुजा चव्हाण व संजय रायमुलकर या दोन डॉक्टरांमध्येच आहे. त्यात ‘चेहरा नवा, बदल हवा’ अशी घोषणा तरूणवर्गाने दिली असून, मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी उच्चशिक्षीत नेतृत्व विधानसभेत पाठविण्याचा निर्धार मतदारांनी केला असल्याचे गावभेट दौर्यांतून दिसून येत आहे.
ऋतुजा चव्हाणच फिक्स; जातीयवादाचा प्रभाव पडणार नाही!
शेतकरी चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व म्हणून डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्याकडे पाहिले जात आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या खांद्याला खांदा देऊन त्या शेतकरी चळवळीत लढलेल्या आहेत. लोकसभेला रविकांत तुपकरांना मेहकरमधून लीड मिळवून देण्यात ऋतुजाताईंसह त्यांचे पती शेतकरी नेते ऋषांक चव्हाण यांचादेखील सिंहाचा वाटा होता. या निवडणुकीला काही जण जातीयवादी वळण देण्याचा प्रयत्न करत असताना, ऋतुजाताईंच्या नेतृत्वावर मात्र त्याचा काहीही फरक पडणार नाही. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात मराठा, मुस्लीम, ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे. हा समाज भावनेच्या भरात नाही तर व्यक्ती पाहून मतदान करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्याचा शिंदे गट किंवा उबाठा गटाला फायदा मिळण्याची शक्यता कमी आहे. सुरूवातीच्या काळात ऋतुजाताई चव्हाण यांच्यासोबत प्रचारात दिसलेला एक शेतकरी नेता अचानक प्रचारातून गायब झाल्याने शेतकरी चळवळीच्या नेत्याविषयी मतदारसंघात संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे. लोकं खासगीत ‘इतके घेतले, तितके घेतले’ अशा चर्चा करत आहेत. तर सर्वसामान्य कार्यकर्ते व शेतकरीवर्ग मात्र ऋतुजाताईंच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दिसून येत आहे.
स्वकीय, राजकीय विरोधकांना शेतकर्यांची ‘वाघीण’ एकटीच भीडणार!