सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – नवी दिल्ली येथे नूतन संसद भवनची निर्मिती होत असून, ते काही दिवसांतच परिपूर्ण असे संसद भवन उभारले जाणार आहे. तरी या नवीन संसद भवन ला ‘अनुभव मंडप ‘नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी जिल्हाधिकारी याच्याकडे केली आहे. आज अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच पंतप्रधान, राष्ट्रपती व पार्लमेंट अफेअर मिनिस्ट्री यांना ई-मेल पोस्ट व समक्ष भेटून निवेदन करण्यात आले आहे.
१२व्या शतकात महात्मा बसवेश्वर महाराज यांनी देखील सामाजिक अडचणीवर मात करण्यासाठी समाजातील सर्व जाती-धर्म-पंत यांच्यातील वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने एक यंत्रणा तयार करून विश्वातील पहिले संसद भवन स्थापन केले त्यालाच अनुभव मंडप असे नामकरण केले होते. १२व्या शतकातील एक आदर्श प्रशासक म्हणून बसवेश्वर यांचे नाव लौकीक आहे. जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांनी १२व्या शतकात अनुभव मंडपाच्या माध्यमातून समाजामध्ये न्याय, बंधुता, एकात्मता, स्वातंत्र्य अधिकार, शिस्त सुशासन आदी गोष्टीवर परीपूर्ण असे अभ्यास करण्यासाठी अनुभव मंडपाची संकल्पना जगासमोर आणली. यात समाजील सर्व स्तरातील स्त्री-पुरुष यांना सहभाग नोंदविता येत असत. त्यामुळे १२व्या शतकातील महात्मा बसवेश्वर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अनुभव मंडपाच्या धर्तीवरच नवी दिल्ली येथे उभारण्यात येणार्या नवीन संसद भवनच्या इमारतीस अनुभव मंडप असे नामाकरण करून त्याच नावाने ओळखण्यात यावे.
यावेळी नूरअहमद नालवार, कल्याणराव चौधरी, श्रीकांत दासरे, मल्लिनाथ सोलापुरे, आकाश तिपरादी, रामलिंग मटगे, शिवानंद गुंडगे, कांचन फाउंडेशन शाखा अध्यक्ष शेखर पाटील, ओमकार पाटील, समर्थ माने, रोहन गायकवाड, आकाश राठोड, विकास कस्तुरे, विशाल तोडकरे , नवनाथ पवार, शेखर दिडेंगावे, सचिन बोराडे, आजय पाटोळे, महेश बोराडे, कुमार सुरवसे, अविनाश बोराडे, राम भोसले, ऊमेश सिरसट, मरूती ऊडाणशिवे, आकाश तांबे, आमोल बोराडे, मारूती बनसोडे, निलेश मस्के, शरिफ शेख, अमोल मस्के, सोमा बिदिमनि, विनायक भालेराव, बालाजी सुरते, लखन साळवे आदी महासभाचे कार्यकर्ते उपस्थित होते.