SOLAPUR

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये रोजा इफ्तार पार्टी उत्साहात

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्यावतीने रमजान निमित्त रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांचे हस्ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांना खजूर भरवून रोजा सोडण्यात आला.

मराठा सेवा संघाने यंदा पहिल्यांदाच सोलापूर झेडपीत रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याने मुस्लिम बांधवांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अविनाश गोडसे म्हणाले की, जिजाऊ जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच आता रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. महापुरुषांच्या जयंती व सण साजरी करण्यामध्ये एकच उद्देश आहे तो म्हणजे सर्व धर्म समभाव रहावा. आपल्यातील सामाजिक सलोखा अबाधित रहावा हाच मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. या प्रंसगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सुनील कटकधोंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अधिक्षक अनिल जगताप, कक्ष अधिकारी सचिन साळुंखे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!