लोणार/बिबी (ऋषी दंदाले) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशात पायी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद जिल्ह्यात मिळाला. गोरगरीब, सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी, कामगार, युवावर्ग आणि व्यापारीवर्ग यांची काँग्रेसशी घट्ट नाळ जुळलेली आहे. आता ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाच्या माध्यमातून आपण आणि आपला पक्ष प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचून ही जुळलेली नाळ आणखी घट्ट केली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले. काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ मोहिमेचा लोणार येथे समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते. या मोहिमेला तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळाला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशाने व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार लोणार तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने लोणार शहरात प्रत्येक वार्डात घराघरात सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत जाऊन हाथ से हाथ जोडो अभियान हा समारोप कार्यक्रम नवीन घरकुल येथे लोणार तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस कमिटी, लोणार नगरपालिकेच्या वतीने आयोजित केला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, भारत जोडो यात्रा जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे पार पाडली. राहुलजी गांधी यांची सर्वसर्वसामान्य जनतेच्याप्रती असलेली आपुलकी, काळजी, प्रेम ह्या सर्व गोष्टी आपण भारत जोडो यात्रेदरम्यान अनुभवल्यात. त्याच्याच एक भाग म्हणून आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये हाथ से हाथ जोडो अभियान यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न केला. लोणार शहरातील आपण सर्व नागरिक सदैव आमच्या पक्षाच्या पाठीशी असता. असेच आपले प्रेम सहकार्य आम्हाला सदैव द्या. लोणार शहरामध्ये दिनांक १३ मार्चपासून संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये फिरून हाथ से हाथ जोडो अभियान यशस्वीपणे राबविले, याबद्दल मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, असेही राहुल बोंद्रे म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा.काँग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ, समन्वयक श्यामभाऊ उमाळकर, माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणदादा घुमरे, नगराध्यक्षा सौ पूनमताई पाटोळे, प्रदेश सेवा दलाचे प्रकाशभाऊ धुमाळ, शांतीलाल गुगलीया, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, उपनगराध्यक्ष बादशाह खान, गटनेते भूषण मापारी, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष सोनुने, माजी सभापती पंचायत समिती ज्ञानेश्वर चिभडे मामा, तालुका अध्यक्ष राजेश मापारी, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी शेख समद शेख अहमद, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गजानन खरात, महिला तालुकाध्यक्ष सौ.ज्योतीताई राठोड, सरपंच शालिक घायाळ, इत्यादी पदाधिकारी व्यासपीठावर होते.
याप्रसंगी हर्षवर्धन सपकाळ, श्यामभाऊ उमाळकर, लक्ष्मण दादा घुमरे, साहेबराव पाटोळे, बादशाह खान यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजेश मापारी यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रामुख्याने प्रदीप संचेती, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तोफिक कुरेशी, आरोग्य सभापती संतोष मापारी, दौलत मानकर, ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे, मा.नगरसेवक रमजान गवळी, मा.नगरसेवक रउफभाई, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सतीश राठोड, माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब, मा.नगरसेवक प्रा सुदन कांबळे सर, माजी नगरसेवक पंढरी चाटे, माजी अरुण जावळे, माजी शेख असलम शेख कासम, माजी नगरसेवक, रामचंद्र कोचर, अतिक कुरेशी, युवक काँग्रेसचे शेख सज्जाद, वसंत जावळे, माजीद कुरेशी, एन.एस. यु.आय.जिल्हा सरचिटणीस शेख जुनेद शेख करामत, एन एस यु आय जिल्हा सरचिटणीस ओम पाटोळे, संजय चव्हाण, असंघटित काँग्रेस सेल शहराध्यक्ष शेख अफसर भाई शेख अजमत शेख अनामत, मनीष पाटोळे, भवानी मापारी, पप्पू कुरेशी, मीडिया सेलचे मोहसीन शहा, माजी नगरसेवक बळीराम मदनकर, माजी नगरसेवक शंकर हेद्रे, पुरुषोत्तम इरतकर, अप्पा शिंदे, संजय चव्हाण, श्रीकृष्ण बाजड, अनिल पाटोळे इत्यादी पदाधिकारी यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष हजर होते. यावेळी लोणार नगरपालिकेच्यावतीने जेवणाच्या कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे संचालन ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा गजानन खरात यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष शेख समद यांनी मानले.