जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक; सरकारने नेमलेल्या समितीच्या आदेशाची होळी!
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – शासनाने जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात गठीत केलेल्या समितीच्या निवडीच्या पत्राची होळी करण्यात आले. तसेच या होळीच्या भोवती बोंबा ठोकून त्या समितीचा निषेध करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आवारात आज शासकीय कर्मचार्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी व कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करण्यासाठी संपाचा दुसरा दिवस पाळण्यात आला. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुनी पेन्शन लागू करा, वेतन त्रुटी दूर करा, कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम करा, मागास वर्गीय कर्मचारी यांना पदोन्नती देणे अशा विविध मागण्यांचा आक्रोश करण्यात आला. गोलाकार पध्दतीने उभे राहून कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची होळी करण्यात आली. बक्षी समितीने केलेल्या शिफारशी यापूर्वीच कर्मचारी यांचेवर अन्याय करणारे आहेत. पुन्हा बक्षी यांना समितीवर घेतल्यामुळे कर्मचारी यांच्या मध्ये संतापाची लाट होती. यावेळी महिला कर्मचारी अश्विनी शिंदे, उषा भोसले, सविता मिसाळ, आरती माडेकर, राजश्री कांगरे, भारती चव्हाण, सुनिता भुसारे, फर्जाना शेख, सुचिता जाधव, अश्विनी घोडके, अंजली पाटील, श्रीमती रांजणे, काळे , मंजिरी घोडके, छाया क्षीरसागर, अनिता तुपारे, अंजली पेठकर, ज्योती लामकाणे, ममता काशेट्टी, मृणालिनी शिंदे, श्रीमती पंगुलवाडे, सुजाता कांबळे, ज्योती काटकर, अनुपमा पडवळे, नंदा तरटे, क्षमा तांबोळी, रेखा राजगुरू, स्वपर्णिका लिंगराज, लक्ष्मी शिंदे, अंजली पेठकर, प्रज्ञा कुलकर्णी, अंजली पाटील, कर्मचारी संघटनेचे अरूण क्षीरसागर, गिरीष जाधव, कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, कास्ट्राईब संघटनेचे अरूण क्षीरसागर, दिनेश बनसोडे, श्रीकांत मेहरकर, योगेश हब्बू, विशाल घोगरे, अनिल जगताप, पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव, मोहित वाघमारे, एस पी माने, शंकर बंडगर, प्रशांत दबडे, मुकूंद आकुडे, महादेव शिंदे, गणेश हुच्चे, अंनिल पाटील, आप्पाराव गायकवाड, उपस्थित होते. यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
संपावर जाणाऱ्या झेडपी कर्मचाऱ्यावर होणार शिस्तभंगाची कारवाई
पेन्शन मिळावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून जिल्हा परिषदेचे कर्मचारी संपावर गेले आहेत. परंतु जे कर्मचारी संपावर गेले आहेत अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईची नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी दिली. शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून जिल्हा परिषदेसह सर्व विभागाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेचे सर्व कामकाज दोन दिवसापासून पूर्णपणे ठप्प झाले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे जवळपास 12 हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. यातील 267 कर्मचारी मेडिकल रजेचे कारण सांगून रजेवर गेले आहेत. परंतु अशा कर्मचाऱ्यांना रजा देण्यात येणार नाही. तर अनुकंपा तत्वाखालील व कंत्राटी कर्मचारी असे जवळपास 4 हजार 987 कर्मचारी प्रत्यक्ष कामावर हजर होते. तर जवळपास सात हजार 750 कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना संपावर गेल्यामुळे वेतन तर मिळणार नाही. शिवाय जे कर्मचारी रजेचे कारण सांगून संपावर गेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना नोटीस देखील बजावण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे काम नाही तर वेतन नाही, शिस्तभंगाची कारवाई तसेच सेवेमध्ये अडथळा निर्माण करणे आदी कारणामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर शिष्टभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान सध्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा सुरू आहेत. तरी या परीक्षा काळामध्ये शिक्षक संपावर न जाता कार्यरत असल्यामुळे सध्या या परीक्षा सुरळीत सुरु असल्याची माहिती सीईओ कोहिणकर यांनी दिली.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात यांच्या विरोधात मला एका संघटनेने तक्रार दिली आहे. परंतु या तक्रारीची सत्यता पडताळणीसाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
– संदीप कोहिणकर, सीईओ