Uncategorized

वनविभागाकडून सागवान पाट्यासह वाहन जप्त : आरोपी अटकेत

गडचिरोली (जिल्हा प्रतिनिधी)विनापरवाना अवैधरित्या सागवान पाट्याची वाहतूक करताना वनविभागाने वाहन जप्त करून 78 हजार 578 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई 23 जून रोजी करण्यात आली असून वनविभागाने एका आरोपीस अटक केली असून एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

 

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 23 जून रोजी श्रिनिवास कटकू, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिरोंचा यांचे नेतृत्वात रंगधामपेठा गाव परिसरात वनकर्मचारी गस्त करीत असतांना पहाटेच्या सुमारास 04.00 वाजता वाहन क्रमांक AP-05/U 0981 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 वरुन सिरोंचा कडे जातांना दिसले. तेव्हा सदर वाहनाला अडवून पाहणी करीत असतांना वाहनचालक शंकर हा उतरुन फरार होण्यात यशस्वी झाला तेव्हा वाहनावरील अन्य इसम नामे श्रीनिवास मलय्या मोडा, रा. धनवाडा, ता. काटारम (तेलंगाणा) यांना ताब्यात घेवून सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनाचे खालील भागावर दोन सागवान पाटया आढळून आले तेव्हा त्यानंतर वाहनाची अधिक पाहणी केली असता वाहनामध्ये सागवान पाटया एकुण 18 नग रचुन त्यावर लोखंडाचा पत्रा टाकुन लपवून ठेवण्यात आलेले दिसुन आले. तेव्हा मोक्यावर जप्तीनामा, पंचनामा नोंद करुन एकुण सागवांन नग 20 घनमीटर 1.120, रक्कम 78 हजार 578 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपीला ताब्यात घेवून सदर वाहन ताब्यात घेवून वाहन वनपरिक्षेत्र कार्यालय, सिरोंचा येथे आणून आरोपीविरोधात भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 26 (1), 41, 42(2) व 52 नुसार गुन्हा दाखल करुन पुढील चौकशी सुरु आहे.

 

सदर कारवाई पुनम पाटे (भावसे), उपवनसंरक्षक, सिरोंचा यांचे मार्गदर्शनात श्रीनिवास म. कटकू, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिरोंचा, ए.एच. गहाणे, क्षेत्र सहाय्यक, वर्धम, एम. जे. धुवे, वनरक्षक, आर. वाय. तलांडी, वनरक्षक व रोजंदारी वनमजूर यांनी पार पाडली असुन पुढील चौकशी श्रीनिवास कटकू, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिरोंचा यांचे मार्गदर्शनाखाली ए.एच. गहाणे, क्षेत्र सहाय्यक, वर्धम हे करीत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!