BuldanaPolitical News

राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक.. शिवसेनेच्या ‘त्या’ 15 बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना केंद्राची वाय प्लस सुरक्षा!

बुलडाणा-(ब्रेकींग महाराष्ट्र) महाराष्ट्रामध्ये शिवसेना बंडखोर नेत्यांच्या कार्यालय व गाड्यांची तोडफोड सुरु आहेत. शिवसेना बंडखोर आमदारांनी राज्य सरकारने सुरक्षा काढल्याचा आरोप केल्यानंतर केंद्राच्या वतीने 15 बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
               गेल्या दोन दिवसांमध्ये गुवाहाटीमध्ये थांबलेल्या शिवसेना आमदारांपैकी काहींच्या कार्यालयांमध्ये तोडफोड झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे या आमदारांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचं बोलले जात आहे. यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारवर देखील आरोप केला जात होता. शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी पाटील, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयांमध्ये तोडफोडीच्या घडना समोर आल्या होत्या. शिवसेनेनं भाजपासोबत हातमिळवणी करून नैसर्गिक युती करावी आणि राज्यात सत्ता स्थापन करावी, अशी अट बंडखोर आमदारांच्या गटाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घालण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्यानंतर या सगळ्या घडामोडी नेमक्या कोणत्या दिशेने जात आहेत, याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच आता आमदारांना केंद्रीय सुरक्षा देण्याचा निर्णय समोर आल्यामुळे त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर  गुवाहाटी मध्ये असलेल्या बंडखोर या पार्श्वभूमीवर आता गुवाहाटी मध्ये असलेल्या बंडखोर आमदारांपैकी जवळपास 15 आमदारांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकराने वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.  प्रकाश सुर्वे, सदानंद सरवनंकर, योगेशदादा कदम, प्रताप सरनाईक, दामिनी जाधव, प्रदीप जयस्वाल, संजय राठोड, दादाजी भुसे, दिलीप लांडे, बालाजी कल्याणनर, संदीपन भुमरे, लताबाई सोनावणे, मंगेश कुल्याळकर, रमेश बोरनारे, संजय शिरसाट यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे वाय प्लस सुरक्षा!

बुलडाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांची ललकार
आम्ही उध्दव साहेबांसोबतच-वसंतराव भोजने
बुलडाणा जिल्ह्यातील शिवसैनिक एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या मागे की उध्दवजींसोबत असा सवाल जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उपस्थीत केला होता. या पार्श्वभुमीवर सोमवार २७ जून रोजी सकाळी १० वाजता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांच्या समर्थनासाठी शिवसेना मलकापूर मतदारसंघाचे वतीने नांदुरा येथील मोठ्या हनुमान मुर्तीला अभिषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. उध्दवजींचे हात मजबूत करण्यासाठी तळ्यामळ्यात न करता जाहीर समर्थन देण्यासाठी शिवसैनिक व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन घाटाखालील शिवसेना जिल्हा उपप्रमुख वसंतराव भोजने, तथा लालाभाऊ इंगळे शहर प्रमुख तथा उपाध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे.

शिवसेनेला आणखी एक झटका, उदय सामंत गुवाहाटीकडे रवाना..
एकीकडे शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत एकनाथ शिंदे गटातील शिवसेना बंडखोर नेत्यांना कब तक छुपोंगे गुवाहाटी, आणाही पडेगा चौपाटी, असा दम देत असतांनाच आज 26 जून रोजी दुपारी 3 वाजता शिवसेनेचा एक आमदार उदय सावंत हे गुवाहाटीकडे रवाना झाल्याने शिवसेनेला पत्रकार परिषद पुर्वीच एक झटका बसला आहे. तर राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेना बंडखोर आमदारांना सुरक्षा पोहचविण्याचे आदेश मुंबईच्या पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!