Breaking newsMumbaiPolitical NewsPolitics

बाळासाहेबांची शिवसेना ही सुपर पॉवर- खा संजय राऊत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्रात पॉलिटीकल ड्रामा सुरूच असून .शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते आसाममधील गुवाहाटी येथे आहेत . मात्र अद्यापही शिंदे यांचे बंड थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही बंडखोर आमदारांकडून बैठका सुरू आहेत तर इकडे शिवसेनेकडून सुद्धा बैठका आणि मेळावे सुरू आहेत काल झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत बंडखोर आमदारांवर कारवाईचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहे . 8 मंत्र्याची मंत्री पदावरून हकालपट्टी होणार असल्याची सुत्राची माहिती आहे . अश्यात आज सकाळी खा. संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना बंडखोर आमदारांना इशारा देत हिम्मत असेल तर आमदारकीचा राजीनामा स्वतच्या बापाच्या नाव लावून निवडून दाखवा . बाळासाहेबांची शिवसेना ही सुपर पॉवर असल्याचे राऊत यांनी सांगितले यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री राणे यांचे कौतुक करीत त्यावेळी राणे यांनी राजीनामे देवून निवडणुकीला समोर गेले होते असे सांगितले होते.

 

 

राज्यात सत्ता संघर्ष सुरूच असून त्यावर अद्यापही कोणता तोडगा निघाला नाही . या बंडखोरी विरोधात राज्यात शिवसेनेने उत्तर द्यायला सर्वात केली आहे.अनेक ठिकाणी बंडखोरांच्या कार्यालयाचे तोडफोड करण्यात येत आहे .तर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी मोर्चे काढून बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासून चपला मारून येत आहे . तर 8 मंत्र्याची मंत्रिपदे धोक्यात आली असून 16 आमदारांना निलंबनाची नोटीस देण्यात आली असून 48 तासात उत्तर देण्याचे सांगितले आहे. यावर शिंदे गटाकडून कायदेतज्ञाशी सल्ला मसलत करण्यात आली असून सुप्रीम कोर्टात जाण्यासंबधी सुद्धा बैठक झाली असून ॲड रस्तोगी व ॲड साळवे यांच्या सल्ला घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहेत तर बंडखोर आमदारांचा गुवाहाटी येथील मुक्काम 30 जून पर्यंत वाढला आहे. तर आज 25 जून रोजी पत्रकारांशी बोलतांना खा. संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आव्हान देत तुमच्यामधे हिम्मत असेल तर आमदारकीचे राजीनामे द्या आणि निवडणूक लढवा आहे असे म्हटले यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री राणेंचे कौतुक केले . तर बाळासाहेबांची शिवसेना ही सुपर पॉवर आहे . आमचा एकच बाप असून आमच्या बापाचं नाव लावण्या पेक्षा बंडखोरांनी स्वतःच्या बापाचं नाव लावून निवडून दाखवा असे थेट आव्हान बंडखोर आमदारांना दिले आहे त्यामुळे आता हा सत्ता संघर्ष किती दिवस चालणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!