BuldanaChikhaliVidharbha

ईडा पिडा टळू दे बळींच राज्य येऊ दे…लुटारु सरकारच राज्य जाऊ दे- प्रशांत पाटील

चिखली (तालुका प्रतिनिधी) –  दिनांक २६ जून रोजी रयत क्रांती पक्षाच्या वतीने चिखली येथे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ईडा पिडा टळू दे बळींच राज्य येऊ दे लुटारुंच राज्य जाऊ दे.. असं साकडं बळीराज्याला राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांच्या नेतृत्वात घालण्यात आलं.

यावेळी रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी बोलतांना या महाभकास तीन तिघाडी सरकारने मागील अडीच वर्षामध्ये संपूर्ण राज्यांमध्ये कुठला ही विकास न करता फक्त घोटाळेच केलेले आहेत यांचे बरेच मंत्री या घोटाळ्यापाई जेलची हवा खात आहेत व काहीं मंत्र्यांवर कारवाईची टांगती तलवार आहेच व लवकरच ते ही जेल मध्ये दिसतील ,या सरकारला चक्रीवादळ असेल गारपीट असेल महापूर असेल यामध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून कुठली ही ठोस मदत देण्यात आलेली नाही,खरीप हंगाम सुरू झाला असतांना सुद्धा अजून बँकेकडून शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यात आलेलं नाही या सरकारने परीक्षामध्ये सुध्दा घोटाळे करून राज्यातील शेतकरी कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ – खंडोबा केला आहे, राज्यातील मोठमोठ्या उधोजकांना मुबलक वीज पुरवल्या जात आहे व एकीकडे शेतकऱ्यांची सक्तीची वीज वसुली करून वीज तोडणी हे जुलमी सरकार करत आहे,कित्तेक शेतकऱ्यांचे ऊसाचे प्रश्न असतील, कांदा उत्पादक असतील या शेतकऱ्यांचे हाल तर बघितल्या ही जात नाही कधी नव्हे इतका अतिशय निचांक असा भाव कांद्याला या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मिळालेला आहे या सरकारच्या कार्यकाळात बोगस खत विक्री होऊन भरमसाठ भाव वाढ झालेली आहे असे एक नाही कित्येक समाश्या असतील हे सरकार सोडवू शकलेले नाहीत त्यामुळे रयत क्रांती पक्षाने बळीराज्याला साकड घालून ईडा पिडा टळू दे बळींच राज्य येऊ दे महाविकास आघाडीच या लुटारुंच राज्य जाऊ दे असे अनोख आंदोलन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रयत क्रांती संघटना व पक्षाच्या वतीने करण्यात आले,या आंदोलनात प्रशांत ढोरे पाटील,वंदना ताई वाघ,सचिन पडघान,विशाल वायाळ,सचिन काकडे,दीपक पुंगळे,गँगाधर भुतेकर,सुनील पाटील,कुंदाताई भुजबळ,विशाल जाधव,रामदास भुजबळ, सिद्धेश्वर गायकवाड, समाधान काठोले, कैलास पाटील,प्रकाश पंडागळे,गजानन इंगळे,प्रदीप इंगळे,पुष्पाताई खरे,शे.बिलाल शे. गुलाम,रामेश्वर ठेंग,गजानन,ठेंग,लक्ष्मीताई ठेंग,उषाताई ठेंग,मनीषा ताई भुतेकर,रफिक शहा,समाधान खरे,यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!