सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – उळेवाडी (तालुका दक्षिण सोलापूर) या गावाने मला आमदारकीच्या निवडणुकीमध्ये १२ मते कमी पडले आहेत. तरीही येणार्या काळामध्ये पक्ष गट तट न पाहता गावासाठी भरघोस निधी देणार असल्याचे आश्वासन अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अक्कलकोट मतदारसंघ येथील उळेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे विविध विकासकामे, जल जीवन मिशन अंतर्गत (पाणीपुरवठा) भूमिपूजन तसेच ९५ लाखांहून अधिक निधीचे भूमिपूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी आमदार कल्याणशेट्टी बोलत होते.
पुढे बोलताना आमदार कल्याण शेट्टी म्हणाले, ऊळेवाडी हे गाव अनेक वर्षापासून विकासापासून वंचित होते. तरी या तीन वर्षात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ऊळेवाडी गावात विकास कामांची गंगा वाहत आहे. तसेच येणार्या पुढील काळात मी स्वतः या गावाचा पालकत्व म्हणून स्वीकारले आहे. या गावासाठी कुठल्याही प्रकारचा विकास निधी कमी पडू देणार नसल्याचेही सांगितले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य आण्णाराव बाराचारी, भाजपा दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष रामाप्पा चिवडशेट्टी, शिवसेना तालुका प्रमुख संदीप राठोड, उमेश काळे, भाजपा सरचिटणीस आप्पासाहेब मोटे, सरपंच शरणप्पा चौडे, उपसरपंच वसिम कारभारी, ग्रा.प.सदस्य सलीमा शेख, ग्रा.प.सदस्य लहूदास पवार, सदस्य अमजत शेख, सदस्य स्वाती घायाळ, सदस्य बेबी गुरवे, सदस्य सोमनाथ पवार, सागर पवार, तसलिम कारभारी, संतोष मोहिते, पांडूरंग डोंबाळे, सरदार शेख, प्रदिप गाडेकर व बोरामणी गटातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होती.
छोट्या गावाला न्याय देणार!
अक्कलकोट मतदार संघात मोठ्या प्रमाणात गावाची संख्या आहे. तरी मोठ्या गावाकडे सर्वांचे लक्ष असते. परंतु छोटी गावे विकासापासून वंचित राहतात. परंतु मी आपल्या मतदारसंघातील जे-जे छोटे गावे आहेत त्या गावांमध्ये भरघोस निधी देणार आहे. त्यासाठी छोटी गावे असली तरी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उळेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये सांगितले.