Uncategorized

अंत्री खेडेकर येथे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

चिखली (विशेष प्रतिनिधी) – तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे मराठी माध्यमिक शाळेमध्ये आज, १२ जानेवारीरोजी सकाळी साडेआठ वाजता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्त मराठी माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थी, वर्गशिक्षक, अंगणवाडी सेविका, व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे भाषणे केलीत. गावातील बचत गटाचे सदस्य व ग्रामस्थांचीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!