ChikhaliVidharbha

मिसाळवाडी येथे राजमाता जिजाऊ मॉसाहेब जयंती साजरी

– जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकला जिजाऊ मॉसाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत

चिखली (विशेष प्रतिनिधी) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे या दोन राजांना घडविणार्‍या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांची जयंती मिसाळवाडी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. मिसाळवाडी गावाचे लोकप्रिय उपसरपंच हनुमान मिसाळ व ग्रामपंचायत सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जिजाऊ मॉसाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

जिजाऊ मॉसाहेब जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळू पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेविका भूमिका इंगळे मॅडम, कृषिसहाय्यक ठेंग मॅडम या उपस्थित होत्या. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लोणकर सर, ताठे सर, वाघ सर, िंचचोणकर सर यांनी राजमाता जिजाऊंच्या कार्याची महती याप्रसंगी विषद केली. तर सूत्रसंचलन ताठे सर, लोणकर सर यांनी केले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या गीता संतोष भगत, रुपाली बळीराम मिसाळ, छाया किशोर सुरडकर, नंदा विजय कोलते, अनिल किसन काकडे, विजय शिनगारे यांच्यासह मोठ्या प्रमाणात मिसाळवाडीतील स्त्री-पुरूष ग्रामस्थांची उपस्थिती होती.


गावात पहिल्यांदाच जिजाऊ जयंती साजरी

मिसाळवाडी गावापासून जवळच असलेले सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊ मॉसाहेबांचे जन्मगाव. तर मिसाळवाडी गावातील अनेक महापुरूषांनी राजे लखोजीराव जाधव यांच्या सैन्यात त्याकाळी सेवा दिलेली आहे. परंतु, आजपर्यंत कधी गावात जिजाऊ मॉसाहेबांची जयंती साजरी झाली नव्हती. तथापि, उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आलेले कर्तव्यदक्ष तथा लोकप्रिय युवानेते हनुमान मिसाळ यांच्या पुढाकारातून मिसाळवाडी गावात पहिल्यांदाच जिजाऊ जयंती साजरी झाली आहे. दरवर्षी या जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णयदेखील आज घेण्यात आला. गावात पहिल्यांदाच जिजाऊ मॉसाहेबांची जयंती साजरी केल्याबद्दल ग्रामस्थांनी हनुमान मिसाळ व त्यांच्या सहकार्यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!